रितेश घेतोय लूकवर मेहनत

By Admin | Updated: July 2, 2016 03:10 IST2016-07-02T03:10:53+5:302016-07-02T03:10:53+5:30

विकता का उत्तर या रिअ‍ॅलिटी शोद्वारे अभिनेता रितेश देशमुख छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

Taking Ritesh is hard work | रितेश घेतोय लूकवर मेहनत

रितेश घेतोय लूकवर मेहनत


विकता का उत्तर या रिअ‍ॅलिटी शोद्वारे अभिनेता रितेश देशमुख छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. रितेश या मालिकेचे सूत्रसंचालन करणार आहे. मराठीतील आपली एंट्री दमदार व्हावी, यासाठी सध्या रितेश चांगलाच मेहनत घेतोय. या कार्यक्रमातील त्याच्या लूककडेही तो स्वत: लक्ष देत आहे. या कार्यक्रमातील त्याच्या वेषभूषेसाठी वाहिनी अथवा प्रोडक्शन हाउसच्या डिझायनरची मदत न घेता तो स्वत:च्या डिझायनरनेच बनवलेले कपडे घालणार असल्याचे कळतेय. या कार्यक्रमाबद्दल तो प्रचंड उत्सुक आहे. कारण या कार्यक्रमात केवळ स्पर्धकालाच नव्हे, तर स्टुडिओत बसलेल्या प्रेक्षकांनाही पैसे जिंकण्याची संधी मिळणार असल्याचे कळतेय.

Web Title: Taking Ritesh is hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.