‘किल दिल’नंतर मोठा ब्रेक घेणार

By Admin | Updated: November 13, 2014 00:01 IST2014-11-13T00:01:01+5:302014-11-13T00:01:01+5:30

अभिनेत्री परिणिती चोप्रा ‘किल दिल’च्या रिलीजनंतर काही महिने पडद्यावरून गायब होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर ती तब्बल 9 ते 1क् महिन्यांच्या ब्रेकवर जाणार आहे.

Take a big break after 'Kill heart' | ‘किल दिल’नंतर मोठा ब्रेक घेणार

‘किल दिल’नंतर मोठा ब्रेक घेणार

अभिनेत्री परिणिती चोप्रा ‘किल दिल’च्या रिलीजनंतर काही महिने पडद्यावरून गायब होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर ती तब्बल 9 ते 1क् महिन्यांच्या ब्रेकवर जाणार आहे. परिणितीने सांगितले की, ‘मी ‘किल दिल’च्या रिलीजनंतर ब्रेक घेत आहे. त्यानंतर कदाचित 9-1क् महिने मी पडद्यावर दिसणार नाही. शाद अलीचे दिग्दर्शन असलेल्या ‘किल दिल’ या चित्रपटात परिणितीसह गोविंदा, रणवीर सिंह आणि अली फजल यांच्या मुख्य भूमिका आहेत. परिणितीने सांगितले की ती सध्या अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचत आहे; पण ‘किल दिल’बाबतच्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर ती पुढचा चित्रपट साईन करेल. ब्रेकदरम्यान परिणितीने काही योजनाही आखल्या आहेत. ती म्हणाली, ‘कराची आणि दुबईमध्ये राहणा:या काही जवळच्या मित्रंना भेटण्यासाठी मी दोन आठवडय़ांची सुट्टी घेणार आहे; पण आम्ही कराची किंवा दुबईत भेटणार नसून एका वेगळ्याच ठिकाणी भेटण्याचा प्लॅन आहे.’

 

Web Title: Take a big break after 'Kill heart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.