'ते एखाद्या गोष्टीपासून पळ काढतील असे..'; गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणावर ऑनस्क्रीन लेकाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:07 AM2024-04-30T11:07:21+5:302024-04-30T11:08:01+5:30

Samay shah: समय शाह याने 'तारक मेहता'मध्ये गुरुचरण सिंह यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्याची माहिती ऐकल्यावर तो शॉक्ड झाला आहे.

taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-gurucharan-singh-missing-onscreen-son-samay-shah-reaction | 'ते एखाद्या गोष्टीपासून पळ काढतील असे..'; गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणावर ऑनस्क्रीन लेकाची प्रतिक्रिया

'ते एखाद्या गोष्टीपासून पळ काढतील असे..'; गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणावर ऑनस्क्रीन लेकाची प्रतिक्रिया

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंह सोढी २२ एप्रिलपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. अचानकपणे ते गायब झाल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. यामध्येच त्यांच्या ऑनस्क्रीन मुलाने म्हणजेच 'तारक मेहता'च्या गोगीने म्हणजेच  समय शाहने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

गोगीने अलिकडेच 'पिंकविला'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने गुरुचरण यांच्याविषयी बातमी ऐकून शॉक्ड झाल्याचं म्हटलं आहे.  "ही गोष्ट ऐकल्यानंतर मला त्यावर विश्वासच बसत नव्हता. मला सतत वाटत होतं की बातमी खोटी आहे. पण, ज्यावेळी मी क्रॉस चेक केलं तर माझाच माझ्यावर विश्वास बसेना. मी त्यांच्या दोन्ही नंबरवर फोन केला पण त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही", असं गोगी म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "त्यांची मिसिंग रिपोर्ट करण्यात आल्याचं कळलं आणि मला धक्काच बसला. मला खात्री आहे ते लवकरच परत येतील. ते असे व्यक्ती नक्कीच नाहीत जे एखाद्या गोष्टीपासून पळ काढतील."

नेमकं काय आहे प्रकरण?
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत दिसलेले अभिनेते गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) गेल्या ७ दिवसांपासून बेपत्ता आहेत. दिल्लीत आईवडिलांची भेट घेतल्यानंतर ते फ्लाईटने परत मुंबईला येणार होते. मात्र ना त्यांनी फ्लाईट पकडली आणि ना ते दिल्लीतील घरी परत गेले. त्यांच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 
 

Web Title: taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-gurucharan-singh-missing-onscreen-son-samay-shah-reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.