'रश्मि रॉकेट'साठी चांगलाच घाम गाळतेय तापसी पन्नू, शेअर केला फोटो

By गीतांजली | Updated: November 10, 2020 19:06 IST2020-11-10T18:57:44+5:302020-11-10T19:06:16+5:30

आपल्या भूमिकेला व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी ती चांगलीच मेहनत घेते आहे.

Taapsee pannu working out very hard for rashmi rocket | 'रश्मि रॉकेट'साठी चांगलाच घाम गाळतेय तापसी पन्नू, शेअर केला फोटो

'रश्मि रॉकेट'साठी चांगलाच घाम गाळतेय तापसी पन्नू, शेअर केला फोटो

अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतेच जयपूरमध्ये तिच्या दक्षिण भारतीय चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता ती आगामी ‘रश्मि रॉकेट’ सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. सिनेमात ती एका धावपटूची भूमिका साकारणार आहे.  आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी, तिची मेहनत या फोटोमधून दिसून येते आहे.


सकाळी ग्राउंडमध्ये वर्कआउट करत असताना तप्पसी पन्नूने एक फोटो शेअर केला, यात ती धनुरासन करताना दिसतेय. याआधीही, तापसीने 'रश्मि रॉकेट'चा फर्स्ट लूक शेअर केला होता. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला कंपनी 'आरएसव्हीपी' च्या बॅनरखाली केली जात आहे. आकर्ष खुराना यांनी त्याचे दिग्दर्शन करणार आहे. अभिनेत्री तापसीसोबत या चित्रपटात 'एक्सट्रैक्शन' फेम प्रियांशु पेंथुली प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

कच्छच्या रणापासून सुरुवात करून, रश्मि रॉकेट एका गावकरी तरुणीची कथा आहे, जिच्याकडे, वेगवान धावण्याची शक्ती आहे. ती एक अविश्वसनीय वेगवान धावपटू आहे आणि त्यामुळे गाववाले तिला 'रॉकेट' म्हणूनच ओळखतात. जेव्हा आपल्या प्रतिभेला व्यावसायिक रुपात साकारायची तिला संधी मिळते तेव्हा या संधीला ती वाया जाऊ देत नाही.

फिनिश लाइनपर्यंत पोहोचण्याची ही शर्यत अनेक अडथळ्यांची आहे आणि एका एथलेटि प्रमाणेच ही शर्यत देखील तिच्यासाठी सन्मान, आदर आणि इतकेच नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्याच्या लढाईत परावर्तित होऊन जाते. 'रश्मि रॉकेट' 2021 मध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
 

Web Title: Taapsee pannu working out very hard for rashmi rocket