भार्गवी चिरमुले दिसणार जिजाऊंच्या भूमिकेत, तर शहाजीराजेंची भूमिकेत झळकणार 'हा' अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 15:55 IST2020-09-03T15:52:16+5:302020-09-03T15:55:17+5:30

डॉ. अमोल कोल्हे 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत एक खास भूमिका साकारत आहेत. 2 सप्टेंबरपासून डॉ. अमोल कोल्हे या मालिकेत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत.

'Swarajyajanani Jijamata' Serial To Take A Leap, Actress Bhargavi Chiramule To Play Role Of Jijau | भार्गवी चिरमुले दिसणार जिजाऊंच्या भूमिकेत, तर शहाजीराजेंची भूमिकेत झळकणार 'हा' अभिनेता

भार्गवी चिरमुले दिसणार जिजाऊंच्या भूमिकेत, तर शहाजीराजेंची भूमिकेत झळकणार 'हा' अभिनेता

'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. शहाजी राजांना बंगळूर प्रांतात जावं लागलं असून जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आल्या आहेत. आता या पुढे मालिकेत रसिकांना स्वराज्य बांधणीची रंजक कथा आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून मालिकेत रसिकांना नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. जिजाऊ माँ साहेबांची भूमिका भार्गवी चिरमुले ही अभिनेत्री करणार आहे, तर शहाजी राजांची भूमिका शंतनू मोघे हा अभिनेता करणार आहे शिवबांच्या भूमिकेत दिवेश मेडगे हा बालकलाकार दिसणार आहे. दिवेशने या आधी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छोट्या संभाजीची भूमिका साकारली होती.

आणखी रसिकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे डॉ. अमोल कोल्हे 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत एक खास भूमिका साकारत आहेत. 2 सप्टेंबरपासून डॉ. अमोल कोल्हे या मालिकेत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत. याबद्दल त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर करत  भूमिकेबद्दलचा खुलासा न करता चाहत्यांसह आनंद शेअर केला होता. 

मालिकेतील लूकचा फोटो शेअर करुन त्यांनी कॅप्शन दिले, ''अ सरप्राईज! साधारण ८ महिन्यांनंतर पुन्हा... दिनांक 2 सप्टेंबर पासून.... "स्वराज्यजननी जिजामाता" सोनी मराठी वाहिनीवर रात्रौ 8.30 वाजता! ...जय शिवराय!'' एकंदरीतच पुन्हा एकदा डॉ. अमोल कोल्हे आणि भार्वगी चिरमुले यांना छोट्या पडद्यावर बघण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक होते. त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला असणार हे मात्र नक्की.

Web Title: 'Swarajyajanani Jijamata' Serial To Take A Leap, Actress Bhargavi Chiramule To Play Role Of Jijau