स्वप्निल जोशीची नायिका बनण्याचे स्वप्न पूर्ण: स्नेहा चव्हाण
By Admin | Updated: October 26, 2015 00:13 IST2015-10-26T00:13:19+5:302015-10-26T00:13:19+5:30
‘स्वप्निल जोशीची नायिका बनणे आणि प्रतिष्ठित अशा प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळणे हे माझे स्वप्न सत्यात उतरले आहे, ही भावना आहे

स्वप्निल जोशीची नायिका बनण्याचे स्वप्न पूर्ण: स्नेहा चव्हाण
‘स्वप्निल जोशीची नायिका बनणे आणि प्रतिष्ठित अशा प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळणे हे माझे स्वप्न सत्यात उतरले आहे, ही भावना आहे स्नेहा चव्हाण हिची.. संजय लीला भन्साळी निर्मित आणि शबिना खान सहनिर्मित पहिल्या मराठी चित्रपटामध्ये स्वप्निल जोशीची नायिका बनण्याची संधी स्नेहाला मिळाली आहे. ‘हिरॉईन’ सीझन २च्या टँलेंट हंटमध्ये सहभागी झालेल्या ५५००हून अधिक स्पर्धकांमधून तिची निवड करण्यात आली असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.
सहनिर्मात्या शबिना खान म्हणाल्या, ‘आमच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या नायिकेच्या शोधाची स्नेहाच्या निवडीने सांगता झाली, याचा आम्हाला आनंद आहे. स्नेहा चित्रपटातील आपल्या भूमिकेला योग्य न्याय देईल आणि मराठी चित्रसृष्टीवर राज्य करेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी स्वप्निल जोशीच्या ‘मितवा’ चित्रपटासाठीदेखील अशाच प्रकारे हिरोईनचे टॅलेंट हंट घेण्यात आले होते, त्यामध्ये प्रार्थना बेहरेची वर्णी लागली होती.