स्वप्निल पुन्हा मालिकेत
By Admin | Updated: May 21, 2015 23:14 IST2015-05-21T23:14:57+5:302015-05-21T23:14:57+5:30
छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर जाण्यासाठी कलाकार खूप मेहनत घेत असतात. मात्र चित्रपट हिट गेल्यानंतर अचानक टीव्हीवरील मालिकेत येणे म्हणजे आश्चर्यच म्हणावे लागेल.

स्वप्निल पुन्हा मालिकेत
छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर जाण्यासाठी कलाकार खूप मेहनत घेत असतात. मात्र चित्रपट हिट गेल्यानंतर अचानक टीव्हीवरील मालिकेत येणे म्हणजे आश्चर्यच म्हणावे लागेल. मराठीतला सुपरस्टार स्वप्नील जोशी लवकरच छोट्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झालाय. ‘मितवा’ चित्रपटात अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारा स्वप्निल विशेष पाहुणा कलाकार म्हणून टीव्हीवर दिसेल. सध्या तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या एका मालिकेत काही एपिसोडसाठी तो येणार आहे.