स्वराने घेतला ब्रेक
By Admin | Updated: October 18, 2014 23:54 IST2014-10-18T23:54:29+5:302014-10-18T23:54:29+5:30
स्वरा भास्कर सध्या कजर्तमध्ये सलमान खान आणि सोनम कपूरच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाचे शूटिंग करीत आहे.

स्वराने घेतला ब्रेक
स्वरा भास्कर सध्या कजर्तमध्ये सलमान खान आणि सोनम कपूरच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. चित्रपटात ती सलमान खानच्या बहिणीच्या भूमिकेत दिसेल. या शूटिंगमधून ब्रेक घेत स्वराला नवी दिल्लीतील तिच्या मिरांडा हाऊस या कॉलेजच्या वतीने एका डिबेटमध्ये भाग घ्यायचा आहे. या डिबेटमध्ये अनेक बडय़ा हस्ती सहभागी होतील. महाविद्यालयाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी स्वराने ‘प्रेम रतन धन पायो’चे निर्माते सूरज बडजात्या यांना ब्रेकची विचारणा केली आहे. निर्मात्यानेही तिची अडचण लक्षात घेऊन तिला ब्रेक दिल्याचे समजते.