छोट्या पडद्यावर सुष्मिता
By Admin | Updated: September 10, 2014 05:50 IST2014-09-10T05:50:42+5:302014-09-10T05:50:42+5:30
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी मिस युनिवर्स सुष्मिता सेन आता टीव्हीवर दिसण्याची शक्यता आहे

छोट्या पडद्यावर सुष्मिता
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी मिस युनिवर्स सुष्मिता सेन आता टीव्हीवर दिसण्याची शक्यता आहे. सुष्मिता लवकरच अभिनयात पुनरागमन करणार आहे. तिने पुनरागमनासाठी बंगाली चित्रपटाची निवड केली आहे. दुसरीकडे ती आता छोट्या पडद्यावर काम करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. सुष एका ड्रामा सिरीजमध्ये काम करणार असून ही ड्रामा सिरीज अमेरिकन टीव्ही सिरीयल रिव्हेंजने प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. रिव्हेंज एक सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. ही एका अशा मुलीची कथा आहे, जी तिच्या वडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या सर्वच लोकांचा बदला घेऊ इच्छिते. या मुलीच्या वडिलांचा विश्वासघात करून त्यांना तुरुंगात पाठविण्यात येते. सुष्मिता सेनने २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी ती पुनरागमन करीत आहे.