सुशांत-क्रिती सनॉन झळकणार एकत्र
By Admin | Updated: November 25, 2015 02:13 IST2015-11-25T02:13:49+5:302015-11-25T02:13:49+5:30
बॉलीवूडमध्ये चाहत्यांना शाहरूख-काजोल, रणबीर-दीपिका, अमिताभ-रेखा अशा प्रसिद्ध आणि आयकॉनिक जोड्या मोठ्या पडद्यावर पाहायला नेहमीच आवडते

सुशांत-क्रिती सनॉन झळकणार एकत्र
बॉलीवूडमध्ये चाहत्यांना शाहरूख-काजोल, रणबीर-दीपिका, अमिताभ-रेखा अशा प्रसिद्ध आणि आयकॉनिक जोड्या मोठ्या पडद्यावर पाहायला नेहमीच आवडते. पण त्याबरोबरच फ्रेश जोडी जर चित्रपटात दिसणार असेल तरीही त्याची चर्चा होते. अशीच एक नवी जोडी बी-टाऊनमध्ये येणार आहे. दिनेश विजन दिग्दर्शित पहिल्याच चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सनॉन एकत्र येणार आहेत. या चित्रपटाचे अद्याप नाव ठरलेले नाही मात्र हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असणार आहे. सोशल मीडियावर आलेल्या फोटोमधून तर दोघांमध्ये ग्रेट केमिस्ट्री दिसून येत आहे. चाहत्यांनीसुद्धा या जोडीला पसंती दिली आहे. ‘लव्ह आज कल’, ‘कॉकटेल’, ‘बदलापूर’सारख्या चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर दिनेश आता दिग्दर्शनात हात अजमावणार आहे.