रिलीजपूर्वीच सरप्राईज झाले लीक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 04:04 IST2017-04-14T04:04:03+5:302017-04-14T04:04:03+5:30
‘बाहुबली 2’बद्दल सध्या एक नवी बातमी आहे. या चित्रपटात प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज होते; पण आता हे सरप्राईजच लीक झाले आहे. अभिनेता प्रभास या चित्रपटात डबल नाही

रिलीजपूर्वीच सरप्राईज झाले लीक!
‘बाहुबली 2’बद्दल सध्या एक नवी बातमी आहे. या चित्रपटात प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज होते; पण आता हे सरप्राईजच लीक झाले आहे. अभिनेता प्रभास या चित्रपटात डबल नाही तर ट्रिपल रोलमध्ये दिसेल. ‘बाहुबली 2’मध्ये प्रभास डबल रोलमध्ये दिसणार, हे तर सगळ्यांना माहीत होते. एक म्हणजे पित्याची भूमिका अर्थात अमरेन्द्र बाहुबली आणि दुसरी म्हणजे त्याचा मुलगा महेन्द्र बाहुबलीच्या रूपात; पण प्रभास त्याशिवाय आणखी एका रोलमध्ये दिसणार आहे. ते म्हणजे महेन्द्र बाहुबलीच्या आजोबाच्या भूमिकेत. धर्मेन्द्र बाहुबली असे त्याच्या या व्यक्तिरेखेचे नाव असेल. सध्या या ट्रिपल रोलची बातमी सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे. आता यात किती सत्य आहे, हेच आपल्याला ‘बाहुबली 2’ रिलीज झाल्यानंतरच कळेल.