सूरज चव्हाणची लगीनघाई, संजनाच्या घरी घाणा भरण्याचा कार्यक्रम पडला पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:33 IST2025-11-27T12:31:53+5:302025-11-27T12:33:17+5:30
सूरजची होणारी बायको संजना गोफणे हिच्या घरी घाणा भरण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.

सूरज चव्हाणची लगीनघाई, संजनाच्या घरी घाणा भरण्याचा कार्यक्रम पडला पार
Suraj Chavan to be wife Sanjana Dance Video: 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता आणि 'टिकटॉक' स्टार सूरज चव्हाण सध्या चर्चेत आहे. आता सुरजच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरूवात होत असून अवघ्या काही दिवसांत तो लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाच्यापूर्वीच्या विधींना सुरुवातही झाली आहे. सूरजची होणारी बायको संजना गोफणे हिच्या घरी घाणा भरण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात संजनानं धमाल डान्स केलाय. या डान्सच्या व्हिडीओनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
संजनानं घाणा भरण्याच्या कार्यक्रमासाठी सुंदर साजश्रृंगार केला होता. तिनं हिरव्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यासोबत पारंपरिक दागिने परिधान केले होते. तसेच केसात गजरा माळून लूक पुर्ण केला. घाण्याच्या कार्यक्रमावेळी संजनानं डान्ससुद्धा केला. तिचा हा व्हिडीओ तिच्या मेकअप आर्टिस्टनं सोशल मीडियावर शेअर केलाय, जो जोरदार व्हायरल होतोय. दरम्यान, लग्नाच्या सुरुवातीला विधीपूर्वक धान्य कांडणे या विधीला 'घाणा भरणे' असे म्हंटले जाते.
सूरज चव्हाणचा लग्नसोहळा हा २९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यांचा हा पारंपरिक विवाह सोहळा पुण्याजवळील जेजूरी, सासवड येथे होणार असल्याची माहिती समोर येत आहे. लग्नाच्या मुख्य समारंभापूर्वीचे विधी २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या समारंभात हळद, मेहंदी आणि संगीत यांसारखे पारंपरिक समारंभ पार पडतील.
संजना ही सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. विशेष म्हणजे, त्यांचे हे लग्न अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. आता सूरज आणि संजना यांना पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.