सूरज, अथियाला पाठिंबा द्या
By Admin | Updated: September 12, 2015 23:20 IST2015-09-12T23:20:28+5:302015-09-12T23:20:28+5:30
सलमान खान च्या प्रोडक्शनअंतर्गत ‘हिरो’ चित्रपट प्रदर्शित झाला. सुपरस्टार सलमान खानने त्याच्या चाहत्यांना विनंती केली की, त्यांनी सुरज पांचोली आणि अथिया शेट्टी यांना चित्रपट
सूरज, अथियाला पाठिंबा द्या
सलमान खान च्या प्रोडक्शनअंतर्गत ‘हिरो’ चित्रपट प्रदर्शित झाला. सुपरस्टार सलमान खानने त्याच्या चाहत्यांना विनंती केली की, त्यांनी सुरज पांचोली आणि अथिया शेट्टी यांना चित्रपट पाहून पाठिंबा द्यावा, तसेच त्यांचे बॉलीवूडमध्ये स्वागत करा.’ बॉलीवूडचा दबंग सलमानने सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली यांच्यावर विश्वास ठेवला आहे. टिवटरवर त्याने आवाहन केले आहे की,‘ वेलकम देम इन टू द फिल्म वर्ल्ड विथ ओपन आर्मस विथ एन्जॉयिंग, सपोर्टिंग, एनकरेजिंग देम इन सिनेमाज विथ व्हिसल्स अॅण्ड क्लॅप्स.’ निखील अडवाणी दिग्दर्शित चित्रपट हिरो हा सुभाष घई यांच्या ‘हिरो’ चित्रपटाचा रिमेक आहे. जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री हे १९८३च्या हिरो मध्ये मुख्य भूमिकेत होते.