सुपरनानीलाही शाहरुखची भीती
By Admin | Updated: September 27, 2014 00:58 IST2014-09-27T00:58:39+5:302014-09-27T00:58:39+5:30
हॉलीवूड अभिनेता ब्रॅड पीटच्या फ्युरी या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून शाहरुखमुळे आता सुपरनानीही घाबरली आहे.

सुपरनानीलाही शाहरुखची भीती
हॉलीवूड अभिनेता ब्रॅड पीटच्या फ्युरी या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून शाहरुखमुळे आता सुपरनानीही घाबरली आहे. अभिनेत्री रेखा यांची मुख्य भूमिका असलेला सुपरनानी हा चित्रपट २४ आॅक्टोबरला रिलीज करण्यात येणार होता. पण याच दिवशी शाहरुखचा हॅप्पी न्यू ईअर हा चित्रपट रिलीज होत असल्याने हा चित्रपट आठवडाभर उशिरा म्हणजेच ३१ आॅक्टोबरला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्रकुमार यांनी केले आहे. सुपरनानीमध्ये रेखा यांच्यासोबत शर्मन जोशी आणि अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका आहेत. इंद्रकुमार यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत सांगितले की,‘आम्ही चित्रपटाची रिलीज स्थगित केली आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक महत्वाचे कारण हे ही आहे की, आम्हाला शाहरुखशी टक्कर घ्यायची नाही.’ फराह खानचे दिग्दर्शन असलेल्या हॅप्पी न्यू ईअरमध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, सोनू सूद, विवान शाह यांच्या मुख्य भूमिका आहेत.