सनी लिआॅन करणार लावणी?
By Admin | Updated: October 12, 2015 04:48 IST2015-10-12T04:48:18+5:302015-10-12T04:48:18+5:30
काही वर्षांपूर्वी तरुणांना घायाळ करणारी सनी लिआॅन म्हणे मराठी चित्रपटासाठी अप्रोच झाली होती, ती पण ‘शाळा’चा दिग्दर्शक सुजय डहाके याच्या ‘वल्गर अॅक्टिव्हिटीज इंकॉर्प’ या चित्रपटासाठी.

सनी लिआॅन करणार लावणी?
काही वर्षांपूर्वी तरुणांना घायाळ करणारी सनी लिआॅन म्हणे मराठी चित्रपटासाठी अप्रोच झाली होती, ती पण ‘शाळा’चा दिग्दर्शक सुजय डहाके याच्या ‘वल्गर अॅक्टिव्हिटीज इंकॉर्प’ या चित्रपटासाठी. पण त्याच्या पुढे काही विशेष घडले नाही. आता चित्रपट नाही पण मराठीच्या इव्हेंटच्या माध्यमातून का होईना तिची इच्छा पूर्ण होणार आहे. इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल अॅवॉर्डस् (इम्फा)च्या व्यासपीठावर तिची पावले थिरकणार आहेत. एखाद्या मराठी पुरस्कार सोहळ्यात नृत्य करण्याची सनीची पहिलीच वेळ आहे. या वर्षी महोत्सवाची थीम ही ‘मराठी इन बॉलिवूड’ अशी आहे. सेक्सी अदाकारी आणि सादरीकरणासाठी सनी लिआॅन फेमस आहे. पण एखादी लावणी आणि मराठी गाण्यावर सनी लिआॅनला पाहणे ही खरंच एक पर्वणी ठरणार आहे.