सनी लिओनीने मुलांच्या सरोगेट आईला दिली मोठी रक्कम, स्व:ताच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:59 IST2025-08-29T13:58:52+5:302025-08-29T13:59:51+5:30
सनी लिओनीला सरोगसीसाठी किती खर्च आला? म्हणाली...

सनी लिओनीने मुलांच्या सरोगेट आईला दिली मोठी रक्कम, स्व:ताच केला खुलासा
Sunny Leone Surrogacy Journey: आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनी आज चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तिची भारतामध्ये जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सनी लिओनी लवकरच अभिनेत्री सोहा अली खानच्या 'All About Her' या पॉडकास्टमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये सनीने तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे आणि वैयक्तिक अनुभव शेअर केले आहेत. विशेषतः, तिने पालकत्व, सरोगसी आणि दत्तक घेण्याबद्दल केलेले खुलासे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.
सोहा अली खानच्या 'All About Her' या पॉडकास्टमध्ये सनीने सनीने तिच्या सरोगसीच्या अनुभवाबद्दल सांगितलं. मुलांच्या सरोगसीसाठी तिने सरोगेट आईला खूप मोठी रक्कम दिली. सनी म्हणाली, "ती इतकी मोठी रक्कम होती की तिने स्वतःसाठी एक छान घर विकत घेतले आणि तिला हवं तसं भव्य लग्नही केलं". तिने हे देखील स्पष्ट केले की, ती फक्त सरोगेट आईलाच नाही, तर तिच्या पतीलाही आठवड्याला पैसे देत होती. कारण, त्याला कामावरून सुट्ट्या घ्याव्या लागत होत्या.
या मुलाखतीत सनीने स्पष्ट केले की, तिला स्वतःला गर्भधारणा करायची नव्हती. हा निर्णय तिचा आणि तिचा पती डॅनियल वेबर यांचा होता. त्यामुळे त्यांनी दत्तक आणि सरोगसीचा मार्ग निवडला, ज्यामध्ये त्यांना अनेक अडचणी आल्या. सनीने २०१७ मध्ये निशा नावाच्या मुलीला दत्तक घेतले. त्यानंतर २०१८ मध्ये सरोगसीद्वारे तिला नोहा आणि अशर ही दोन जुळी मुले झाली. तिने नेहमीच दत्तक घेण्याचे ठरवले होते, असंही तिनं या पॉडकास्टमध्ये सांगितलं. सनी लिओनीच्या या स्पष्ट आणि प्रामाणिक खुलास्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याची एक वेगळी बाजू समोर आली आहे.
दरम्यान, सोहा अली खानच्या 'All About Here' या पॉडकास्टमध्येमहिलांच्या आरोग्याबाबत, त्यांच्या प्रगतीबाबत तसेच त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, याबद्दल चर्चा केल्या जातात. सोहा अली खानच्या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री मलायका अरोराने हजेरी लावली होती.