सनी लिऑन बनणार 'भाभी जी'
By Admin | Updated: September 20, 2016 14:39 IST2016-09-20T14:14:04+5:302016-09-20T14:39:46+5:30
टीव्ही शो 'भाभी जी घर पर हैं' मध्ये लवकरच मोठा धमाका होणार. कारण या शोमध्ये एक नवी एन्ट्री होत आहे. बॉलिवुडची हॉट अभिनेत्री

सनी लिऑन बनणार 'भाभी जी'
ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.20- टीव्ही शो 'भाभी जी घर पर हैं' मध्ये लवकरच मोठा धमाका होणार. कारण या शोमध्ये एक नवी एन्ट्री होत आहे. बॉलिवुडची हॉट अभिनेत्री सनी लिऑन लवकरच यामध्ये एन्ट्री करणार आहे.
यापुर्वी सनी छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस आणि स्प्लिट्सव्हिलामध्ये दिसली होती. मात्र, पहिल्यांदाच एखाद्या फिक्शन (काल्पनीक) शोमध्ये सनी दिसणार आहे. यामध्ये सनी 'भाभी जी' बनून प्रेक्षकांना हसवताना दिसेल.
'भाभी जी घर पर हैं' चे सर्व कलाकार सनीचं स्वागत करायला उत्सूक आहेत. सनीने स्वतः या बातमीला दुजोरा देताना म्हटले, 'हो मी लवकरच तुम्हाला या कार्यक्रमात दिसेल, प्रेक्षकांना खूप मजा येईल' अशी अपेक्षा तिने व्यक्त केली . सनी या शोमध्ये सनी लिऑन म्हणूणच येणार आहे. आगामी चित्रपटाचा नायक शोधण्यासाठी दिग्दर्शकासोबत ती शोमध्ये एन्ट्री घेताना दिसेल, त्यानंतर काय होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागेल.