सुनील बनणार राजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2016 04:36 IST2016-08-18T04:36:58+5:302016-08-18T04:36:58+5:30
सुनील बर्वे काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नटसम्राट’ या चित्रपटात झळकला होता. ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नुकत्याच रंगभूमीवर दाखल झालेल्या नाटकाचा तो निर्मातादेखील आहे.

सुनील बनणार राजा
सुनील बर्वे काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नटसम्राट’ या चित्रपटात झळकला होता. ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नुकत्याच रंगभूमीवर दाखल झालेल्या नाटकाचा तो निर्मातादेखील आहे. यानंतर आता सुनील एका चित्रपटात काम करणार आहे. तो एका सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटात काम करणार असून, एक वेगळीच भूमिका तो साकारत आहे. या चित्रपटाविषयी सीएनएक्सशी बोलताना सुनील सांगतो, ‘या चित्रपटाची कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. या चित्रपटाचा काळही खूपच वर्षांपूर्वीचा आहे. राजा-महाराजांच्या काळातील हा चित्रपट असून, या चित्रपटात मी एका राजाची भूमिका साकारत आहे. मी आतापर्यंत साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा ही वेगळी भूमिका आहे. या चित्रपटातील माझी रंगभूषा आणि वेशभूषा ही खूप वेगळी असणार आहे. राजाच्या वेशातच मी या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.’