सुमोना नाही सोडणार कपिलला
By Admin | Updated: June 11, 2016 02:26 IST2016-06-11T02:26:07+5:302016-06-11T02:26:07+5:30
अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ‘द कपिल शर्मा शो’ सोडणार असल्याची चर्चा कित्येक दिवसांपासून आहे.

सुमोना नाही सोडणार कपिलला
अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ‘द कपिल शर्मा शो’ सोडणार असल्याची चर्चा कित्येक दिवसांपासून आहे. पण ती हा कार्यक्रम सोडणार नसल्याचे तिने स्वत: स्पष्ट केले आहे. सुमोना म्हणाली, ‘‘मी ‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम सोडण्याचा कोणताही विचार केलेला नाही. हा कार्यक्रम करणे मी स्वत: खूप एन्जॉय करते. मी आजही या कार्यक्रमाचा भाग आहे. मी कार्यक्रम सोडणार असल्याच्या ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत.’’