'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याची नवी मालिका, विक्रम-वेताळच्या भूमिकेत दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 10:53 AM2024-05-09T10:53:51+5:302024-05-09T10:54:31+5:30

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याची नव्या मालिकेत एन्ट्री, प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज

sukh mhanje nakki kay asat fame actor kapil honrao to play raja vikramaditya in jay jay shanidev serial | 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याची नवी मालिका, विक्रम-वेताळच्या भूमिकेत दिसणार

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याची नवी मालिका, विक्रम-वेताळच्या भूमिकेत दिसणार

छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचं प्रेम मिळालेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं'. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. जयदीप आणि गौरी यांच्याबरोबरच मालिकेतील इतर पात्रांनाही भरभरुन प्रेम मिळालं. याच मालिकेत मल्हारची भूमिका साकारून अभिनेता कपिल होनराव घराघरात पोहोचला. या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गौरी-जयदीपच्या पूर्नजन्माची कथा आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे मल्हार हे पात्र आता मालिकेत दिसत नाही. या मालिकेच्या पहिल्या पर्वानंतर मल्हार पात्र साकारणाऱ्या कपिलने मालिकेतून एक्झिट घेतली. त्यानंतर आता तो नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कपिलची सोनी टीव्हीवरील नवीन मालिकेत एन्ट्री झाली आहे. 'जय जय शनिदेव' या मालिकेतून आता कपिल प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या मालिकेत तो राजा विक्रमादित्य ही भूमिका साकारताना दिसणार आहे. 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेनंतर आता प्रेक्षकांना कपिलच्या या नव्या मालिकेची उत्सुकता आहे. मल्हारपेक्षा अतिशय वेगळी अशी भूमिका कपिल साकारताना दिसणार आहे. 'जय जय शनिदेव' ही मालिका सोम ते शुक्र रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेता संकेत खेडकर मुख्य भूमिकेत असणार आहे.  

Web Title: sukh mhanje nakki kay asat fame actor kapil honrao to play raja vikramaditya in jay jay shanidev serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.