ह्रतिकच्या मदतीला सुजेन आली धावून
By Admin | Updated: April 27, 2016 22:29 IST2016-04-27T22:29:58+5:302016-04-27T22:29:58+5:30
एकाकी पडलेल्या हृतिकच्या मदतीला त्याची घटस्फोटीत पत्नी सुजेन खान धावून आली आहे. सुजेनने ट्विटरवर ह्रतिकसोबतचा फोटो अपलोड केला आहे.

ह्रतिकच्या मदतीला सुजेन आली धावून
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यामधील कायदेशीर लढाई प्रत्येक दिवशी नवं वळण घेत आहे. हृतिक रोशन आणि कंगना राणावत दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. एकीकडे हृतिक रोशन आपला कंगनाशी काहीच संबंध नसल्याचं सांगत आहे तर दुसरीकडे ह्रतिक खोटं बोलत असल्याचा दावा कंगना करत आहे.
एकाकी पडलेल्या हृतिकच्या मदतीला त्याची घटस्फोटीत पत्नी सुजेन खान धावून आली आहे. सुजेनने ट्विटरवर ह्रतिकसोबतचा फोटो अपलोड केला आहे. अपलोड केलेला फोटो हा फोटोशॉपमध्ये मॉर्फ (एकत्र) केलेला आहे असं सुजेनन ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे कंगना-ह्रतिकचे मागील २ दिवसापुर्वी सोशलमिडियावर व्हायरल झालेल्या फोटोत किती सत्य आहे हे दाखवण्यासाठी हा फोटो सुजेनने ट्विटरवर टाकला असेल असे नाकारता येत नसून एकप्रकरे ह्रतिकला पाठिंबाच दर्शविला आहे.
त्याचप्रमाणे मी त्याला सपोर्ट करत असल्याचेही सुजेनने म्हटले आहे. सुजेनच्या या फोटोचे कंगना काय उत्तर देते याकडे आता सर्वांचे लक्ष असेल. सुजेनच्या या ट्विटमुळे कंगना ह्रतिकच्या प्रकरणाला नवीन वळन मिळण्याची शक्यता आहे.
pictures are photoshopped and untrue stories carry 2 much weight.another pic for d rec. I support @iHrithik in this. pic.twitter.com/TGKTc40h0J— Sussanne Khan (@sussannekroshan) April 27, 2016