Suhana on Shah Rukh khan Birthday : किंग खानला सुहानाने दिलं खास बर्थ डे गिफ्ट; फोटो पाहून चाहतेही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 13:55 IST2021-11-03T13:55:37+5:302021-11-03T13:55:58+5:30
Suhana on Shah Rukh khan Birthday : सुहानानं आपले वडील शाहरूख खानला दिलं एक स्पेशल बर्थ डे गिफ्ट. २ नोव्हेंबर रोजी होता शाहरूखचा वाढदिवस.

Suhana on Shah Rukh khan Birthday : किंग खानला सुहानाने दिलं खास बर्थ डे गिफ्ट; फोटो पाहून चाहतेही हैराण
Suhana Khan Shares Throwback photo Shah Rukh Khan Birthday : बॉलिवूडचा बादशाह किंग खान (Bollywood King khan) शाहरूखनं २ नोव्हेंबर रोजी आपला ५६ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. शाहरूखच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही अनोख्या अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या. परंतु सर्वात खास शुभेच्छा दिल्या त्या म्हणजे शाहरूखची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) हीनं. सुहानानं आपल्या वडिलांना एक थ्रोबॅक फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सुहानानं आपले वडील शाहरूखसह आपल्या लहानपणीचा एक अनसीन फोटो शेअर केला. सुहानाच्या या फोटोमध्ये तिची आई गौरी खानही खुर्चीवर बसल्याचं दिसून येत आहे. सुहानानं क्युरेस्ट मोनोक्रोमं फोटो शेअर करत हॅप्पी बर्थ डे असं कॅप्शन दिलं आहे. यासोबत तिनं हार्ट इमोजी देखील लावलं आहे.
शनायालाही दिल्या शुभेच्छा
सुहानानं आपली खास मैत्रिण शनाया कपूरलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. थ्रोबॅक फोटोमध्ये सुहाना शनाया सोबत दिसून येत आहे. या फोटोमध्ये दोघीही कॅमेऱ्याकडे पाहून पोझ देताना दिसत आहेत. आय लव्ह यू, हॅप्पी बर्थडे शनाया कपूर असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.
आणखी एका फोचोमध्ये सुहाना आपल्या आपल्या वडिलांसोबत आणि शनाया सोबत दिसत आहे. तिघंही एकमेकांसह खुप खुश असल्याचं दिसून येत आहे. बेस्ट फ्रेन्ड्स असं लिहित तिनं हा फोटो शेअर केला आहे.