Aryan Khan ला जामीन मिळताच पार्टीला गेली बहीण Suhana Khan, व्हायरल झाले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 19:00 IST2021-11-01T18:59:03+5:302021-11-01T19:00:35+5:30

Suhana Khan : बऱ्याच दिवसांपासून तुरूंगात बंद बॉलिवूड स्टार शाहरूख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यनला जामीन मिळाला.

Suhana Khan partying hard after Aryan khan got bail | Aryan Khan ला जामीन मिळताच पार्टीला गेली बहीण Suhana Khan, व्हायरल झाले फोटो

Aryan Khan ला जामीन मिळताच पार्टीला गेली बहीण Suhana Khan, व्हायरल झाले फोटो

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) अखेर घरी पोहोचला. आर्यन घरी गेल्यावर आता कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भाऊ घरी आल्याने बहीण सुहाना खानही (Suhana Khan) आनंदी आहे. बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावरून गायब असलेली सुहाना मित्र-मैत्रिणींसोबत पार्टीला गेलेली दिसली. तिचे पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

बऱ्याच दिवसांपासून तुरूंगात बंद बॉलिवूड स्टार शाहरूख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यनला जामीन मिळाला. आर्यनच्या जामीनानंतर शाहरूख आणि पत्नी गौरी खान आनंदी आहेत. तेच भाऊ घरी परतल्यामुळे बहीण सुहाना खानही न्यूयॉर्कमध्ये एन्जॉय करत आहे. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. ती नुकतीच हॅलोवीन साजरा करताना दिसली.

सुहानाचे पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती तिची मैत्रीण प्रियंका आणि रैनासोबत दिसत आहे. तिची मैत्रीण प्रियंकाने पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तेच या फोटोंवर सुहानाने कमेंट केली 'आय लव्ह यू'.

गेल्या काही आठवड्यांपासून सुहाना पहिलांदाच सोशल मीडियावर दिसली. भाऊ आर्यन खानला ड्रग्स प्रकरणी अटक झाल्यावर ती सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव नव्हती. या महिन्यात तिने इन्स्टावर केवळ तीन पोस्ट केल्या आहेत. एका पोस्टमध्ये तिने वडील शाहरूख खान आणि गौरी खानला ३०व्या मॅरेज अॅनिव्हर्सरीबाबत शुभेच्छा दिल्या. दुसरी पोस्ट आर्यन खान जामीन मिळाल्यावर केली आणि तिसरी पोस्ट मैत्रीण अनन्या पांडेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केली होती.
 

Web Title: Suhana Khan partying hard after Aryan khan got bail