"या" बॉलिवूड अभिनेत्रींसाठी ‘साउथ डेब्यू’ ठरला सक्सेसफूल फॉर्म्युला!

By Admin | Published: April 9, 2017 01:08 AM2017-04-09T01:08:54+5:302017-04-09T01:08:54+5:30

नुकताच प्रियांका चोप्राने जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे स्था मिळविले आहे.सध्या प्रियांका हॉलिवूडमध्ये बरीच व्यग्र आहे. पण आपल्यापैकी

"This" succesful enough for 'South Debut' for Bollywood actresses! | "या" बॉलिवूड अभिनेत्रींसाठी ‘साउथ डेब्यू’ ठरला सक्सेसफूल फॉर्म्युला!

"या" बॉलिवूड अभिनेत्रींसाठी ‘साउथ डेब्यू’ ठरला सक्सेसफूल फॉर्म्युला!

googlenewsNext

- Satish Dongare

नुकताच प्रियांका चोप्राने जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे स्था मिळविले आहे.सध्या प्रियांका हॉलिवूडमध्ये बरीच व्यग्र आहे. पण आपल्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की हॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात एका साउथच्या चित्रपटाने केली होती. प्रियांकाप्रमाणे बॉलिवूडमधील इतरही काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी साउथमधून डेब्यू करत बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा...

ऐश्वर्या राय-बच्चन
सौंदर्यवती ऐश्वर्या राय-बच्चन हिने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आहे. मात्र तिने ‘इरुकर’ (जानेवारी १९९७) या साउथ चित्रपटातून डेब्यू करीत आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. पुढे याच वर्षी तिने आॅक्टोबरमध्ये आलेल्या ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

असिन
असिनने २००१मध्ये ‘नरेंद्रन मकान जयकांतन वाका’ या साउथ चित्रपटातून डेब्यू करीत आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या व्यतिरिक्त तिने अनेक साउथ चित्रपटांमध्ये कामं केले. पुढे २००८ मध्ये आलेल्या ‘गजनी’मधून तिने बॉलिवूड करिअरला सुरुवात केली.

दीपिका पादुकोण
सगळ्यांनाच माहिती आहे की, दीपिका पादुकोणने २००७मध्ये आलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. मात्र तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात ही २००६ पासूनच झाली होती. तिने ‘ऐश्वर्या’ या साउथ चित्रपटातून आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. आज दीपिका बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

उर्मिला मातोंडकर
‘रंगीला’गर्ल ऊर्मिला मातोंडकर हिनेदेखील साउथमधूनच आपल्या करिअरला सुरुवात केली. १९८९मध्ये तिने ‘चाणक्य’ या साउथ चित्रपटातून डेब्यू केला. पुढे १९९१मध्ये तिने ‘नरसिम्हा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

जयाप्रदा
अभिनेत्री तथा राजकारणी जयाप्रदा यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. परंतु त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात एका तेलुगू चित्रपटातून केली. वयाच्या १४व्या वर्षी जयाला शाळेतील डान्स प्रोग्रॅममध्ये परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली होती. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या एका दिग्दर्शकास जया यांचा डान्स खूपच भावला होता. त्यामुळे त्यांनी ‘भूमी कोसम’ या चित्रपटात जयाला डान्सची संधी दिली. यासाठी केवळ तीन मिनिटांच्या या परफॉर्मन्समध्ये जया यांनी असा काही जलवा दाखविला होता की, साउथमधील अनेक निर्माते आणि दिग्दर्शक त्यांच्या प्रेमात पडले होते. पुढे जयाने बॉलिवूडमध्ये १९७९मध्ये ‘सरगम’मधून एंट्री केली.

क्रिती सॅनन
बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारी अभिनेत्री क्रिती सॅनन हिने तिच्या करिअरची सुरुवात साउथ इंडस्ट्रीतून केली. २०१४ मध्ये तिने ‘नेनोक्कडीने’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. पुढे याचवर्षी तिने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. कमीतकमी वेळेत ती बॉलिवूडमध्ये पॉप्युलर झाली.

Web Title: "This" succesful enough for 'South Debut' for Bollywood actresses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.