Stunning! ग्रीन रंगाच्या गाऊनमध्ये दिशा पटानी दिसली खूप ग्लॅमरस, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 06:00 AM2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:00+5:30
दिशाने नुकताच हिरव्या रंगाच्या गाऊनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
![Stunning! Disha Patani looking glamorous in green gown | Stunning! ग्रीन रंगाच्या गाऊनमध्ये दिशा पटानी दिसली खूप ग्लॅमरस, पहा फोटो Stunning! Disha Patani looking glamorous in green gown | Stunning! ग्रीन रंगाच्या गाऊनमध्ये दिशा पटानी दिसली खूप ग्लॅमरस, पहा फोटो](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/79905237-238019257181434-1049656463801685929-n_202001351131.jpg)
Stunning! ग्रीन रंगाच्या गाऊनमध्ये दिशा पटानी दिसली खूप ग्लॅमरस, पहा फोटो
'बागी २' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दिशा पटानीने आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे रसिकांच्या नजरा तिच्यावर खिळवून ठेवल्या आहेत. दिशा आणि टायगरची केमिस्ट्री असलेल्या 'बागी २'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २० कोटींचा गल्ला जमवला होता. तेव्हापासून दिशाच्या फॅन फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. इतकंच नाही तर आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन सतत काही ना काही पोस्ट करणारी दिशा कायमच चर्चेत असते.
दिशाने नुकताच हिरव्या रंगाच्या गाऊनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस व स्टनिंग दिसते आहे. या फोटोत नेहमीप्रमाणे बोल्ड लूक नसला तरी तिच्या लूकने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
2020 मध्ये दिशा अनेक सिनेमांत झळकणार असल्याची चर्चा असून यात मलंग हा सिनेमा आघाडीवर आहे. आदित्य रॉय कपूरसह ती पाहायला मिळणार आहे.
नुकतेच त्यांनी या चित्रपटासाठी अंडरवॉटर किसिंग सीक्वेन्स शूट केला जो जवळपास 1 मिनिटांचा होता.
या चित्रपटात प्रेक्षकांना त्या दोघांचा रोमँटिक अंदाज अनुभवायला मिळणार आहे.