​‘फिलौरी’ची कथा लीक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 19:52 IST2016-09-21T14:17:24+5:302016-09-21T19:52:33+5:30

सध्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये बिझी असलेली अनुष्का शर्मा अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरली आणि मग ती निर्माती बनली. तिच्या ...

The story of 'Fillori' leaked? | ​‘फिलौरी’ची कथा लीक?

​‘फिलौरी’ची कथा लीक?

्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये बिझी असलेली अनुष्का शर्मा अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरली आणि मग ती निर्माती बनली. तिच्या होम प्रॉडक्शनचा पहिला वहिला ‘एन एच10’ हा चित्रपट आला आणि लोकांनी त्याचे बरेच कौतुकही केले. या कौतुकानंतर अनुष्काचा आत्मविश्वास चांगलाच वाढलायं. त्याचा परिपाक म्हणजे अनुष्का शर्मा निर्मित ‘फिलौरी’ हा दुसरा चित्रपट प्रेक्षकांना येत्या काळात बघायला मिळणार आहे. अनुष्काचे चाहते ‘फिलौरी’ची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. मात्र अशास्थितीत ‘फिलौरी’चा एक भाग लीक झाल्याची बातमी आहे. होय, ‘फिलौरी’ एका मंगळ दोष असलेल्या मुलीची कथा असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळ असलेल्या या मुलीचे लग्न ठरलेले असते. मंगळ  दोष दूर करण्यासाठी सर्वात आधी तिचे लग्न एका झाडाशी लावले जाते आणि नंतर मंडपात नवºया मुलासोबत तिचे लग्न होते,अशी चित्रपटाची कथा लीक झाली आहे. अर्थात लीक झालेली ही कथा चित्रपटाचा लहानसा भाग आहे. पण ‘फिलौरी’ हा अंधश्रद्धा आणि समाजातील वाईट चालीरितींवर प्रहार करणारा चित्रपट असणार, हे यावरून स्पष्ट आहे.  अंशईल लाल दिग्दर्शित व अनुष्का शर्मा निर्मित ‘फिलौरी’मध्ये दिलजीत दोसांझ आणि सूरज शर्मा मुख्य भूमिकेत आहे. पुढीलवर्षी मार्चमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: The story of 'Fillori' leaked?