श्रीदेवी झळकणार छोट्या पडद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 02:29 IST2017-06-30T02:29:57+5:302017-06-30T02:29:57+5:30
शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान अनेक बॉलिवूडच्या दिग्गज मंडळींनी या मराठमोळ्या शोमध्ये हजेरी लावत आपल्या सिनेमाचे

श्रीदेवी झळकणार छोट्या पडद्यावर
शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान अनेक बॉलिवूडच्या दिग्गज मंडळींनी या मराठमोळ्या शोमध्ये हजेरी लावत आपल्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन केल्याचे पाहायला मिळाले. आता यापाठोपाठ बॉलिवूड दिवा श्रीदेवीदेखील या शोमध्ये हजेरी लावणार असल्याचे कळतंय. विशेष म्हणजे या वेळी श्रीदेवी मराठमोळ्या लूकमध्ये या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. खास मराठी रसिकांसाठी श्रीदेवी मराठीत संवादही साधणार असल्याचे कळतंय.