विवेक करणार दाक्षिणात्य चित्रपट
By Admin | Updated: October 24, 2016 02:25 IST2016-10-24T02:25:48+5:302016-10-24T02:25:48+5:30
दाक्षिणात्य चित्रपटामध्ये यश संपादन केल्यावर तेथील आघाडीच्या अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत

विवेक करणार दाक्षिणात्य चित्रपट
दाक्षिणात्य चित्रपटामध्ये यश संपादन केल्यावर तेथील आघाडीच्या अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. पण बॉलिवूडमध्ये डाळ शिजत नाही म्हणून दाक्षिणात्य सिनेमाकडे वाटचाल केल्याची उदाहरणे फार कमी आहेत. यात आता विवेक ओबेरॉयची भर पडली आहे. होय, विवेकने आता दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच तो एका तामिळ चित्रपटात भूमिका करणार असल्याची खबर आहे. विवेक तामीळ चित्रपट दिग्दर्शक अजीत यांच्या आगामी चित्रपटात नकारात्मक भूमिका करताना दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्यांच्या नावाचा विचार झाला. पण अखेर विवेकच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. अद्याप या चित्रपटाने नाव निश्चित करण्यात आले नाही.