यशच्या 'टॉक्सिक'चा टीझर प्रदर्शित, 'क्लीन शेव्ह' लूक पाहून चाहते थक्क, हॉलिवूडला टक्कर देणार 'रॉकी भाई'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:50 IST2026-02-20T11:42:45+5:302026-02-20T11:50:22+5:30

रॉकी भाईचा नवा अवतार! 'टॉक्सिक'चा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित

Yash Toxic Teaser Release Clean Shaven Look Budget Box Office Clash Ranveer Singh | यशच्या 'टॉक्सिक'चा टीझर प्रदर्शित, 'क्लीन शेव्ह' लूक पाहून चाहते थक्क, हॉलिवूडला टक्कर देणार 'रॉकी भाई'?

यशच्या 'टॉक्सिक'चा टीझर प्रदर्शित, 'क्लीन शेव्ह' लूक पाहून चाहते थक्क, हॉलिवूडला टक्कर देणार 'रॉकी भाई'?

कन्नड सुपरस्टार यशनं चाहत्यांना सर्वात मोठं सरप्राईज दिलं आहे. त्याच्या आगामी 'टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमधील यशचा हा नवीन अवतार पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. २० व्या शतकातील गोव्याच्या गुन्हेगारी जगावर आधारित हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील नवा 'गेम चेंजर' ठरण्याची शक्यता आहे.

गुन्हेगारी, विश्वासघात आणि सत्तेची हाव याभोवती फिरणाऱ्या या कथेत यश अत्यंत रांगड्या आणि स्टायलिश अंदाजात दिसत आहे. विशेष म्हणजे टीझरच्या शेवटी दिसलेला यशचा 'क्लीन-शेव्हन' लूक चाहत्यांसाठी सर्वात मोठं सरप्राईज ठरलं आहे. दमदार  संगीत, जबरदस्त अ‍ॅक्शन दृश्ये आणि उत्कृष्ट VFX मुळे या चित्रपटाची तुलना जागतिक दर्जाच्या सिनेमांशी केली जात आहे.

टीझर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले, "हा तर हॉलिवूड दर्जाचा चित्रपट वाटतोय". दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केली, "दाढीशिवाय यशला पाहणं अनपेक्षित होतं, पण तो जबरदस्त दिसतोय". १९४० ते १९७० या कालखंडातील गोव्याची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात यश 'राया' नावाची भूमिका साकारतोय. 'टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स'मधून तब्बल चार वर्षांनंतर यश मोठ्या पडद्यावर परतत आहे. 

६०० कोटींचं बजेट आणि तगडी स्टारकास्ट
गीतू मोहनदास यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे बजेट तब्बल ६०० कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपट केवळ यशवर केंद्रित नसून, यामध्ये कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर
'टॉक्सिक' हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी रणवीर सिंगचा बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर २' देखील प्रदर्शित होत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर 'यश विरुद्ध रणवीर' असा मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title : यश की 'टॉक्सिक' का टीज़र: क्लीन-शेव लुक ने चौंकाया!

Web Summary : यश की 'टॉक्सिक' का टीज़र जारी, गोवा में सेट स्टाइलिश गैंगस्टर लुक दिखा। क्लीन-शेव लुक ने चौंकाया। बड़ा बजट, शानदार कास्ट, सिनेमाई तमाशा। 19 मार्च, 2026 को रणवीर सिंह की फिल्म से टक्कर।

Web Title : Yash's 'Toxic' Teaser Drops: Clean-Shaven Look Stuns Fans!

Web Summary : Yash's 'Toxic' teaser reveals a stylish gangster look, set in Goa. The clean-shaven appearance surprised fans. High budget, stellar cast promises a cinematic spectacle. Releasing March 19, 2026, clashing with Ranveer Singh's film.

टॅग्स :Yash Gowda Actorयश