अभिनयातील ब्रेकनंतर समांथा राजकारणात एन्ट्री घेणार? ‘या’ पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 11:24 IST2023-09-08T11:23:36+5:302023-09-08T11:24:18+5:30

Samantha Ruth Prabhu : समांथाने काही दिवस अभिनयातून ब्रेक घेतला आहे. ब्रेकवरुन परतल्यानंतर ती राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

will south actress samantha ruth prabhu join politics after acting break | अभिनयातील ब्रेकनंतर समांथा राजकारणात एन्ट्री घेणार? ‘या’ पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

अभिनयातील ब्रेकनंतर समांथा राजकारणात एन्ट्री घेणार? ‘या’ पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी आहे. ‘यशोदा’, ‘थेरी’, ‘मजिली’, ‘अंजान’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत काम करुन समांथाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. समांथाने काही दिवस अभिनयातून ब्रेक घेतला आहे. सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर समांथा पुन्हा तिच्या कामाला सुरुवात करणार आहे. पण, समांथा ब्रेकवरुन परतल्यानंतर राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

‘सिटाडेल’च्या शूटिंगनंतर समांथाने ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होतं. गेल्या वर्षी समांथाने तिला मायोसायटिस नावाचा आजार झाल्याचा खुलासा केला होता. यामुळे तब्येतीकडे आणि स्वत:कडे लक्ष देण्यासाठी समांथाने काही काळ कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. आता ब्रेकनंतर समांथा राजकारणात येणार असल्याच्या चर्चा आहेत. न्यूज १८ आणि इंडिया हेराल्डनुसार समांथा राजकारणात एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे. याबाबत अभिनेत्रीकडून अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. पण, मीडिया रिपोर्टनुसार, समांथा राजकारणात एन्ट्री घेऊ शकते.

समांथाने नेहमीच शेतकऱ्यांप्रती असलेल्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकदा तिने शेतकऱ्यांना पाठिंबाही दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, समांथा के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षात प्रवेश करत तिच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत समांथाच्या टीमकडून किंवा पक्षाकडून कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला समांथाचा ‘खुशी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात तिने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडाबरोबर स्क्रीन शेअर केली होती.

Web Title: will south actress samantha ruth prabhu join politics after acting break