Waves 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता?, खुलासा करत म्हणाला..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 17:35 IST2025-05-02T17:34:27+5:302025-05-02T17:35:35+5:30
Allu Arjun : 'पुष्पा २' या चित्रपटातून लोकप्रिय झालेला साउथचा अभिनेता अल्लू अर्जुनने वेव्हज समिट २०२५ मध्ये हजेरी लावली. यावेळी तो सिनेमाबद्दल बोलला आणि त्याने असेही सांगितले की तो साउथमधील पहिला अभिनेता आहे ज्याचे सिक्स पॅक अॅब्स आहेत.

Waves 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता?, खुलासा करत म्हणाला..
साउथचा स्टायलिश स्टार अभिनेता अल्लू अर्जुन(Allu Arjun)ने मुंबई पार पडलेल्या वेव्स समिट २०२५ (Waves 2025) मध्ये प्रमुख पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अल्लू अर्जुनने सिनेमातील सिग्नेचर पोझदेखील केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी अल्लू अर्जुनने देश आणि जगभरातील सिनेमावर भाष्य केले. तसेच साउथमध्ये सिक्स पॅक्स अॅब्स ट्रेंड कसा सुरू झाला, याबद्दलही सांगितले.
वेव्हज समिट २०२५ मध्ये अल्लू अर्जुन म्हणाला, 'हो, मी हे २० वर्षांपूर्वी केले होते. याआधी कोणत्याही साउथच्या कोणत्याच अभिनेत्याकडे अॅब्स नव्हते. बॉडी बिल्डिंगबद्दल एक प्रकारचा टॅबू होता. त्यावेळी मला वाटले की ही विचारसरणी बदलण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. माझ्या एका सहकलाकाराने मला हे काम करण्यास मदत केली. खरेतर, त्या सह-कलाकाराने म्हटले होते की साउथमध्ये कोणताही अभिनेता सिक्स पॅक बनवू शकत नाही. मी ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि अॅब्स बनवले.'
या चित्रपटात दिसणार अल्लू अर्जुन
वेव्हज समिट २०२५ मध्ये अल्लू अर्जुनने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितले. तो अॅटलीसोबत 'AA22xA6' हा चित्रपट करत आहे. अॅटलीने शाहरुखसोबत 'जवान' सारखा हिट चित्रपट दिला आहे, त्याने साउथमध्ये 'थेरी' सारखा सुपरहिट चित्रपट देखील बनवला आहे. आता अल्लू अर्जुन आणि अॅटली एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त, अल्लू अर्जुन 'पुष्पा ३' मध्ये देखील दिसणार आहे, या मालिकेतील शेवटचे दोन चित्रपट हिट झाले आहेत, त्यामुळे प्रेक्षक तिसऱ्या भागाचीही वाट पाहत आहेत.