विजय सेतुपतीच्या ब्लॉकबस्टर 'महाराजा'चा सिक्वेल येतोय? चाहत्यांचा आनंद गगनात मावेना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:14 IST2026-01-20T14:04:41+5:302026-01-20T14:14:25+5:30
'महाराजा' चित्रपटाच्या जबरदस्त 'क्लायमॅक्स'ने प्रेक्षकांना थक्क केले होते. आता या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल माहिती समोर आली आहे.

विजय सेतुपतीच्या ब्लॉकबस्टर 'महाराजा'चा सिक्वेल येतोय? चाहत्यांचा आनंद गगनात मावेना!
Vijay Sethupathi Maharaja Movie Sequel : विजय सेतुपती दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यानं अनेक चित्रपटांत दमदार अभिनय करीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जगभरात त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. विजय सेतुपतीचे चित्रपट एकापेक्षा असतात. त्याच्या 'महाराजा' चित्रपटानं तर जगभरात धुमाकूळ घातला होता. 'महाराजा' हा सर्वात यशस्वी आणि चर्चेत राहिलेला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या जबरदस्त 'क्लायमॅक्स'ने प्रेक्षकांना थक्क केले होते. आता या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल माहिती समोर आली आहे.
'डेक्कन क्रॉनिकल'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'महाराजा'चे दिग्दर्शक नितीलन स्वामिनाथन यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी एक अतिशय रंजक संकल्पना तयार केली आहे. त्यांनी ही कल्पना विजय सेतुपतीला ऐकवली आणि विजयला ती प्रचंड आवडली आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर आता दुसऱ्या भागाचे कथानक काय असेल, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
सध्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. सर्व काही नियोजनानुसार झाल्यास, या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
'महाराजा'चा बॉक्स ऑफिसवर डंका
विजय सेतुपतीचा ५० वा चित्रपट असलेला 'महाराजा' केवळ १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला नाही, तर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने जागतिक स्तरावर अमाप लोकप्रियता मिळवली. एका पित्याची आपल्या मुलीसाठीची धडपड आणि कथेतील अनपेक्षित वळणे हे या चित्रपटाच्या यशाचे मुख्य कारण ठरलं होतं.