३५ वर्षांचा झालोय, सिंगल असेन का? विजय देवरकोंडाने डेटिंगच्या चर्चांवर दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:35 IST2025-07-09T12:35:08+5:302025-07-09T12:35:58+5:30
वैयक्तिक आयुष्याविषयी काय म्हणाला विजय देवरकोंडा?

३५ वर्षांचा झालोय, सिंगल असेन का? विजय देवरकोंडाने डेटिंगच्या चर्चांवर दिली प्रतिक्रिया
साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात आघाडीचा आणि लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) चर्चेत आहे. त्याचा 'किंगडम' सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. विजय वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो. काही वर्षांपासून तो अभिनेत्री रश्मिका मंदानाला (Rashmika Mandanna) डेट करत आहे. दोघांनीही कधीच उघडपणे आपलं नातं मान्य केलं नसलं तरी त्यांचं नातं चाहत्यांपासून लपलेलं नाही. नुकतंच एका मुलाखतीत विजयने रिलेशनशिपच्या चर्चांवर मजेशीर प्रतिक्रिया दिली.
'हॉलिवूड रिपोर्टर इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विजय देवरकोंडाला त्याच्या रिलेशिनशिप स्टेटसवरुन प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, "मी आात ३५ वर्षांचा आहे. सिंगल असेन का? तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा तिला मीडियापासून आणि सर्व गॉसिपपासून दूर ठेवायचा तुमचा प्रयत्न असतो. माझं वैयक्तिक आयुष्य खाजगी राहावं आणि अनावश्यक चर्चांना बळी पडून नये असंच मला वाटतं." विजयच्या या उत्तरावरुन हे स्पष्ट होतं की तो रश्मिकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा लोकांना लंच डेट, डिनर डेटवर पाहिलं गेलं आहे. दोघांनी मालदीव ट्रीपही केली होती. तिथे त्यांनी वेगवेगळे फोटो पोस्ट केले तरी चाहत्यांनी काही हिंट्समधून ते सोबत असल्याचं शोधून काढलं होतं.
काही महिन्यांपूर्वी विजय आणि रश्मिकाच्या लग्नाचीही अफवा पसरली होती. मात्र सध्या दोघांचाही लग्नाचा विचार दिसत नाही. रश्मिका एकामागोमाग एक ब्लॉकबस्टर सिनेमे देत आहे. 'अॅनिमल', 'छावा', 'सिकंदर', 'कुबेरा' असे तिचे सिनेमे रिलीज झालेत. आता ती आगामी 'थामा' आणि 'द गर्लफ्रेंड' सिनेमात दिसणार आहे.