"यशाच्या शिखरावर असतानाही रश्मिकाने...", विजय देवरकोंडाने 'गर्लफ्रेंड'चं केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:36 IST2025-11-14T15:36:19+5:302025-11-14T15:36:58+5:30
विजय आणि रश्मिकाने एकमेकांवर उधळली स्तुतीसुमनं

"यशाच्या शिखरावर असतानाही रश्मिकाने...", विजय देवरकोंडाने 'गर्लफ्रेंड'चं केलं कौतुक
अभिनेत्री रश्मिका मंदाना हे नाव सतत चर्चेत आहे. हिंदी आणि दाक्षिणात्य दोन्ही इंडस्ट्रीत रश्मिकाने आपलं स्थान निर्माण केलं आहे. नुकताच तिचा 'द गर्लफ्रेंड' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातील रश्मिकाच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. रश्मिकाचा रिअल लाईफ बॉयफ्रेंड अभिनेता विजय देवरकोंडाने सिनेमाच्या सक्सेस पार्टीला हजेरी लावली. यावेळी त्याने रश्मिकाचं भरभरुन कौतुक केलं.
'द गर्लफ्रेंड'च्या इव्हेंटला विजय देवरकोंडाची खास उपस्थिती होती. इव्हेंटमध्ये विजयने रश्मिकाच्या हाताला किस करत सर्वांसमोर प्रेमाची कबुलीही दिली. रश्मिकाबद्दल तो म्हणाला,"आज रश्मिका माणूस म्हणूनही मोठी झाली आहे. यशाच्या शिखरावर असताना तिने ही स्क्रिप्ट निवडली. यामध्ये वेळ, एनर्जी गुंतवली. कारण तिला ही गोष्ट सगळ्यांना सांगायची होती. या स्टेजवर असतानाही ती हा निर्णय घेते की तिला हा सिनेमा करायचा आहे, ही गोष्ट सांगायची आहे. तिचा हा प्रवास पाहून मला तिचा खूप अभिमान वाटतो. आज तू जे आहेस त्याबद्दल मला तुझा गर्व वाटतो."
तर दुसरीकडे रश्मिका मंदाना म्हणाली,'विजू, तू सुरुवातीपासूनच या सिनेमाचा भाग होतास आणि आज याच्या यशाचाही भाग आहेस. संपूर्ण प्रवासात तू वैयक्तिकरित्या होतास. मी हीच आशा करते की प्रत्येकाच्या आयुष्यात एक विजय देवरकोंडा असावा कारण हा एक आशीर्वाद आहे."
“I hope everyone has a #VijayDeverakonda in their life because that’s a BLESSING” : #RashmikaMandanna 😍🔥💥pic.twitter.com/7Jt67Cscjm
— Pan India Review (@PanIndiaReview) November 12, 2025
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी गेल्या महिन्यात गुपचूप साखरपुडा केल्याचीही चर्चा आहे. दोघांच्या बोटात अंगठी दिसली आहे. अद्याप दोघांनीही स्पष्टपणे नात्याची कबुली दिलेली नाही. मात्र त्यांच्यातलं प्रेम कोणत्या ना कोणत्या पद्धतीने चाहत्यांसमोर येतंच. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघंही लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे.