विजय आणि रश्मिकाचं सिक्रेट डेटिंग? ट्विनिंग फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 17:09 IST2023-11-30T17:07:04+5:302023-11-30T17:09:02+5:30

विजय आणि रश्मिका  ट्विनिंग केल्याचे दिसून आले.

Vijay and Rashmika Twining photos on social media | विजय आणि रश्मिकाचं सिक्रेट डेटिंग? ट्विनिंग फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत

विजय आणि रश्मिकाचं सिक्रेट डेटिंग? ट्विनिंग फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत

'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी दक्षिणी अभिनेत्री रश्मिका मंदानाची मोठी फॅन फॉलोइंग आहे. ती जे काही पोस्ट करतो, त्यावर चाहत्यांची करडी नजर असते. असेच काहीसे विजय देवरकोंडाचे आहे. सध्या दोघांच्या आउटफिट्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. विजय आणि रश्मिका  ट्विनिंग केल्याचे दिसून आले. आता या फोटोंमुळे त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांना आणखीनच खतपाणी मिळाले आहे.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका क्रीम-रंगाच्या हुडीजमध्ये दिसले. त्यावर "Rwdy" असे लिहलेले होते. शिवाय दोघांनी ब्लॅक गॉगल्स देखील घातले होते. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जात असताना विजय देवरकोंडा हुडीजमध्ये दिसला. तर रश्मिका विमानतळावर स्पॉट झाली. 

यापूर्वी सोशल मीडियावर दोघांचे काही फोटो चर्चेत आले होते. ज्यामध्ये दोघांच्या फोटोंचा बॅकग्राउंड सारखाच असल्याचे दिसले होते. ते दोघंजण अनेकदा एकत्र दिसतात. कधी लंचला, कधी डिनरला तर कधी एकत्र सुट्ट्या घालवण्यासाठी परदेशी जातानाही दिसतात. त्यांच्या रिलेशनशिपबद्दल त्यांनी कधीही उघडपणं भाष्य केलेलं नाही. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असंच ते कायम सांगतात. परंतु त्यांच्या चाहत्यांच्या नजरेतून त्या दोघांमध्ये असलेलं खास बाँडिग लपून राहिलेलं नाही.

कामाबद्दल बोलायचे झाले तर, विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री समंथा प्रभू यांचा 'खुशी' चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. तर रश्मिका मंदान्ना देखील अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. तिचा अ‍ॅनिमल हा सिनेमा १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. शिवाय ती पुष्पा २ मध्ये दिसणार आहे.

Web Title: Vijay and Rashmika Twining photos on social media