'टॉक्सिक'मध्ये यश साकारणार 'राया', काय आहे या नावाचा खास अर्थ आणि ऐतिहासिक कनेक्शन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:19 IST2026-01-09T16:18:00+5:302026-01-09T16:19:30+5:30
'टॉक्सिक'च्या टीझरची धूम! यशच्या पात्राचं नाव 'राया' का ठेवण्यात आलं? वाचा नावाचा रंजक अर्थ

'टॉक्सिक'मध्ये यश साकारणार 'राया', काय आहे या नावाचा खास अर्थ आणि ऐतिहासिक कनेक्शन?
Toxic : दाक्षिणात्य सुपरस्टार यश हे नाव आजच्या घडीला कोणत्याही प्रेक्षकवर्गासाठी नवीन नाही. 'केजीएफ'मुळे यश खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. यशचा आज कलाविश्वात मोठा दबदबा असल्याचं पाहायला मिळतं. सध्या त्याच्या आगामी 'टॉक्सिक' या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून काल ८ जानेवारी रोजी यशच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. 'केजीएफ'मधील 'रॉकी भाई' नंतर आता 'राया' म्हणून यश बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा वादळ निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
यशच्या पात्रासाठी 'राया' हे नाव अत्यंत विचारपूर्वक ठेवल्याचं बोललं जात आहे. संस्कृतमध्ये 'राय' किंवा 'राया' या शब्दाचा अर्थ राजा किंवा शासक असा होतो. टीझरमध्ये यशची जी जरब दाखवण्यात आली आहे, त्याला हे नाव अगदी साजेसे आहे. हे नाव ऐतिहासिकदृष्ट्या विजयनगर साम्राज्याचे महान सम्राट कृष्णदेव राय यांची आठवण करून देते, जे त्यांच्या धोरणी आणि पराक्रमी नेतृत्वासाठी ओळखले जात होते.
राया या शब्दाचा दुसरा अर्थ प्रवाह, हालचाल किंवा गती असाही होतो. हे अशा गतीचे प्रतीक आहे जी कधीही थांबत नाही. चित्रपटातील यशचे पात्र कदाचित अशाच एका न थांबणाऱ्या शक्तीसारखे असू शकते, जे अडथळ्यांना जुमानत नाही. दरम्यान, 'टॉक्सिक'चे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी केलं आहे. या चित्रपटात यशसोबत नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवत हा चित्रपट मार्च २०२६ मध्ये सिनेमागृहात धडकणार आहे. 'केजीएफ'मधील 'रॉकी भाई' नंतर आता 'राया' म्हणून यश बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा वादळ निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे.