थरकाप उडवणारे साऊथचे 'हे' पाच चित्रपट, ‘हॉरर’प्रेमी असला तर आवर्जून पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 01:25 PM2023-08-28T13:25:58+5:302023-08-28T13:33:18+5:30

अॅक्शन चित्रपटांप्रमाणेच आता हॉरर चित्रपटही खूप पसंत केले जात आहेत.  हॉरर हा सर्वात जास्त आवडलेला जॉनर आहे.

Top 5 mustwatch South Indian horror Movies | थरकाप उडवणारे साऊथचे 'हे' पाच चित्रपट, ‘हॉरर’प्रेमी असला तर आवर्जून पाहाच!

horror film

googlenewsNext

दक्षिण भारतीय चित्रपटांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. बाहुबली ते पुष्पा आणि आरआरआर सारखे जबरदस्त चित्रपट जगभर पाहिले गेले आहेत. अॅक्शन चित्रपटांप्रमाणेच आता हॉरर चित्रपटही खूप पसंत केले जात आहेत.  हॉरर हा सर्वात जास्त आवडलेला जॉनर आहे. तुम्ही जर हॉरर चित्रपट शोधत असाल, तर थांबा आज आम्ही तुमच्यासाठी दक्षिण भारतीय इंडस्ट्रीतील असे चित्रपट घेऊन आलो आहोत, जे  पाहिल्यावर तुमच्या अंगावर देखील काटा येऊ शकतो. 

'अरुंधति एक अनोखी कहानी'

हा चित्रपट एका रहस्यावर आधारित आहे. जर हे रहस्य उघड झाले तर विनाश येऊ शकतो.  'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टीच्या अभिनयाने हा चित्रपट आणखी दमदार झाला आहे. हा चित्रपट यूट्यूबवर पाहता येईल.

चंद्रमुखी

साऊथच्या सर्वात हॉरर सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर थलैवा रजनीकांतच्या 'चंद्रमुखी'चं नावही समोर येतं. चित्रपटाची कथा पुनर्जन्माशी संबंधित आहे. अक्षय कुमार आणि विद्या बालनचा 'भूल भुलैया' हा देखील याच चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. रजनीकांतचा हा हॉरर चित्रपट यूट्यूबवर पाहता येईल.

गेम ओव्हर

सायकॉलॉजिकल थ्रिलर असलेला हा चित्रपट पॅरानॉर्मल आणि हॉरर अ‍ॅक्टिव्हिटीवर आधारित आहे. तापसी पन्नूच्या मुख्य भूमिकेने हा चित्रपट आणखी दमदार बनवला आहे. नेटफ्लिक्सवर तमिळमध्ये बनलेला हा हॉरर चित्रपट तुम्ही हिंदीमध्ये पाहू शकता.

काश्मोरा

या चित्रपटात एका व्यक्तीची कथा दाखवण्यात आली आहे, जो स्वत: तांत्रिक बनून लोकांकडून पैसे उकळतो आणि एक दिवस तो झपाटलेल्या महालात अडकतो. चित्रपटात हॉररसोबतच कॉमेडीची छटाही आहे.  हा चित्रपट हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

भागमती


अनुष्का शेट्टीच्या 'भागमती'चे नावही सर्वात थरारक चित्रपटात येते. या चित्रपटात अनुष्कावर भूतप्रेताची सावली असल्याचे दाखवण्यात आले आहे. तिची भूमिका अंगावर शहारा आणणारी आहे. चित्रपटात असे अनेक सीन्स आहेत, जे तुम्हाला थक्क करतील. बॉलीवूडमध्ये 'दुर्गामती' या चित्रपटाचा रिमेक बनवण्यात आला असून, त्यात भूमी पेडणेकर आहे. अनुष्का शेट्टीचा 'भागमती' यूट्यूबवर पाहता येईल.
 

Web Title: Top 5 mustwatch South Indian horror Movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.