गोव्यात 'देवरा पार्ट १'च्या शूटिंगला सुरूवात, समोर आला ज्युनियर एनटीआरचा दमदार लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 03:54 PM2024-03-22T15:54:31+5:302024-03-22T15:55:02+5:30

साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर त्याच्या आगामी मास ॲक्शन चित्रपट 'देवरा पार्ट १' साठी चर्चेत आहे.

The shooting of 'Devra Part 1' has started in Goa, Junior NTR's powerful look has come out | गोव्यात 'देवरा पार्ट १'च्या शूटिंगला सुरूवात, समोर आला ज्युनियर एनटीआरचा दमदार लूक

गोव्यात 'देवरा पार्ट १'च्या शूटिंगला सुरूवात, समोर आला ज्युनियर एनटीआरचा दमदार लूक

साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर त्याच्या आगामी मास ॲक्शन चित्रपट 'देवरा पार्ट १' साठी चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेता या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेला होता. त्याचवेळी जान्हवी कपूरही काल हैदराबादहून थेट गोव्याला रवाना झाली होती. आज, २२ मार्च रोजी, कोरटाला शिवाच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या देवरा भाग १ चित्रपटाच्या गोव्याच्या शेड्यूलमधून एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये ज्युनियर एनटीआरचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे.

गोव्यातून समोर आलेल्या ज्युनियर एनटीआरच्या या फोटोमध्ये तो त्याच्या व्यक्तिरेखेच्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्याने मरून रंगाचा चेक्सचा शर्ट घातला आहे आणि त्यावर टॉवेल घेतला आहे. अभिनेत्याने कॉफी रंगाची पँटही घातली आहे. या अभिनेत्याच्या कानात रिंग घातले आहेत आणि कर्ली हेअरस्टाइलवरून तो एका गावकऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजते आहे. त्याचवेळी त्याच्यासोबत चित्रपट दिग्दर्शक कोरटाळा शिवा देखील उपस्थित आहेत.

चित्रपटाची स्टारकास्ट
सैफ अली खान, नंदामुरी कल्याण राम, ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर स्टारर देवरा पार्ट 1 मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. साऊथचा सुपरहिट संगीतकार अनिरुद्ध या चित्रपटाला संगीत देणार आहे. युव सुधा आर्ट आणि टी-सीरीजच्या बॅनरखाली हा चित्रपट बनत आहे. हा चित्रपट आधी ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता आणि आता हा चित्रपट  १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: The shooting of 'Devra Part 1' has started in Goa, Junior NTR's powerful look has come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.