विजय थलपती अ‍ॅक्शन मोडमध्ये; बहुचर्चित ‘लिओ’चा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 11:45 AM2023-10-06T11:45:20+5:302023-10-06T11:51:22+5:30

सुपरस्टार विजय थलपतीच्या ‘लिओ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे.

thalapathy vijay films leo trailer out | विजय थलपती अ‍ॅक्शन मोडमध्ये; बहुचर्चित ‘लिओ’चा ट्रेलर प्रदर्शित

Thalapathy Vijay

googlenewsNext

सुपरस्टार विजय थलपतीच्या ‘लिओ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या ट्रेलरमध्ये विजय थलपती दमदार अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसला.  विजयचे अ‍ॅक्शन सीन्स आणि डायलॉग डिलीव्हरी पाहता हा सिनेमा हिट ठरले अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. धमाकेदार ॲक्शन आणि अफलातून ड्रामा असलेल्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

विजयचा हा चित्रपट अॅक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण आहे. विजयसोबत या चित्रपटात बॉलिवूडचा दमदार अभिनेता संजय दत्तही दिसणार आहे.  संजू बाबानेही त्याच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हे दोन सुपरस्टार एकमेकांना भिडताना पाहायला मिळत आहेत. तर अभिनेत्री तृष्णा कृष्णनची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.  या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केलं. त्यांनी यापूर्वी 'कैथी', 'विक्रम' आणि 'मास्टर' सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘लिओ’मध्ये संजय दत्तशिवाय अनुराग कश्यपही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'लिओ' हा तमिळ चित्रपट आहे. मात्र हिंदीसोबतच इतर अनेक भाषांमध्येही तो प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 19 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो 'वारीसू' चित्रपटात दिसला होता. हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता. याआधी विजयच्या 'मास्टर' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

Web Title: thalapathy vijay films leo trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.