नवरीला बसला आश्चर्याचा धक्का! लग्नात अचानक पोहोचला सुपरस्टार सूर्या, पाहा व्हायरल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:42 IST2025-12-30T12:31:58+5:302025-12-30T12:42:51+5:30
चाहतीच्या लग्नात अचानक पोहोचला सुपरस्टार सूर्या, नवरीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल

नवरीला बसला आश्चर्याचा धक्का! लग्नात अचानक पोहोचला सुपरस्टार सूर्या, पाहा व्हायरल व्हिडीओ
Suriya Attends Fan Wedding Viral Video : आपण अनेकदा श्रीमंतांच्या लग्नात मोठ्या कलाकारांची गर्दी पाहतो. पण, तमिळ सुपरस्टार सूर्याने एका चाहतीच्या लग्नात हजेरी लावून सर्वांनाच थक्क केलं आहे. सूर्याला अचानक आपल्यासमोर उभं पाहून नवरीला तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तिच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सुपरस्टारच्या या साधेपणाचं सगळीकडे कौतुक होतंय.
अरविंद आणि काजल या जोडप्याचे हे लग्न होते. काजल ही सूर्याची मोठी चाहती आहे. अरविंदने आपली होणारी पत्नी काजल हिला सरप्राईज देण्यासाठी सूर्याला पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. काजलला याबद्दल काहीही कल्पना नव्हती. जेव्हा सूर्या लग्नाच्या हॉलमध्ये शिरला, तेव्हा काजलला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नसल्याचं दिसलं. ती सुर्याला पाहून प्रचंड आनंदी झाली होती.
अरविंद आणि काजल या जोडप्यानं त्यांच्या 'काधल्स' या इंस्टाग्राम पेजवर या खास क्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या लग्नात सूर्याने केवळ उपस्थितीच लावली नाही, तर नवदाम्पत्याशी गप्पा मारल्या आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सूर्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने लिहिले, "तिने यापेक्षा सुंदर स्वप्न काय पाहिलं असेल? तिचा हेवा वाटतोय". एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला टॅग करत लिहिलं, "मला माहित नाही कसं, पण माझ्या लग्नातही हे घडवून आण".
सूर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या खूप व्यस्त आहे. 'कांगुवा' आणि 'रेट्रो' नंतर आता तो आरजे बालाजीसोबत 'कर्प्पू' या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तसेच सुर्या हा दिग्दर्शक वेंकी अटलुरी आणि अभिनेत्री ममिता बैजू यांच्यासोबत एका नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. याशिवाय, जीतू माधवन आणि नाझरिया नाझिम यांच्या आगामी चित्रपटातही सूर्या मुख्य भूमिकेत असेल.