रश्मिका-विजयच्या रिस्पेशनला अनवाणीच पोहचला 'हा' सुपरस्टार; सगळेच चकीत, कारण तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 08:11 IST2026-03-05T08:10:33+5:302026-03-05T08:11:29+5:30

ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा अभिनेता राम चरण अनवाणी पाहायला मिळाला. मागील अनेक वर्षापासून बड्या सोहळ्यावेळीही अभिनेता याचप्रकारे दिसून आला होता.

Superstar Ram Charan arrived barefoot at Rashmika Mandanna-Vijay Devarakonda reception; everyone was shocked, what was the reason? | रश्मिका-विजयच्या रिस्पेशनला अनवाणीच पोहचला 'हा' सुपरस्टार; सगळेच चकीत, कारण तरी काय?

रश्मिका-विजयच्या रिस्पेशनला अनवाणीच पोहचला 'हा' सुपरस्टार; सगळेच चकीत, कारण तरी काय?

हैदराबाद - साऊथ इंडियन सिनेमातील सर्वात लोकप्रिय जोडपे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी ४ मार्चला हैदराबाद येथे ग्रँड रिस्पेशन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी फिल्मी जगतातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. परंतु या सर्वांमध्ये सुपरस्टार राम चरणच्या लूकने अनेकांना थक्क केले होते.

ब्लॅक आऊटफिटमध्ये पोहचलेल्या राम चरण याला अनवाणी पाहून सोहळ्याला आलेले चकीत झाले होते. पत्नी उपासनासोबत राम चरण रिस्पेशनला आला होता. राम चरण यांच्या डोक्यापासून पायापर्यंत काळे कपडे होते आणि पायात साधी चप्पलही नव्हती. अनवाणी पायानेच ते सोहळ्याला फिरताना दिसून आले. राम चरण सध्या त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार अयप्पा दीक्षेचे पालन करत आहेत. या कठीण व्रतामध्ये भक्तांना काळे कपडे परिधान करायचे असतात. त्याशिवाय ४१ दिवस अनवाणी राहावे लागते. राम चरण यांची देवावरील श्रद्धा सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनली आहे. लोकांनी राम चरणचे कौतुकही केले आहे.

तसेच ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा अभिनेता राम चरण अनवाणी पाहायला मिळाला. मागील अनेक वर्षापासून बड्या सोहळ्यावेळीही अभिनेता याचप्रकारे दिसून आला होता. इतकेच नाही तर ऑस्कर २०२३ च्या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वीही राम चरणचा हा लूक सर्वांनी पाहिला आहे. सध्या रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा देशभरात सुरू आहे. उदयपूरला लग्न झाल्यानंतर विजय आणि रश्मिका यांनी त्यांच्या गावाला जाऊन तिथे लोकांशी संवादही साधला. त्याशिवाय विजयने त्याच्या जिल्ह्यातील मुलांसाठी स्कॉलरशिप देण्याचीही घोषणा केली.

अयप्पा दीक्षा काय असते?

अयप्पा दीक्षा एक अत्यंत कठीण आणि पवित्र धार्मिक प्रथा आहे. जी भगवान अयप्पाचे भक्त त्यांच्या दर्शनापूर्वी करतात. हा उपवास सामान्यत: ४१ दिवसांचा असतो. या काळात भक्ताला पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते. दीक्षेच्या काळात भक्त केवळ काळ्या अथवा निळ्या रंगाचे कपडे घालू शकतात. या काळात भक्ताला चप्पल किंवा बूट त्याग करावा लागतो. प्रत्येक ठिकाणी अनवाणीच जावे लागते. या उपवासाच्या काळात मांसाहार करता येत नाही. दाढी, केस कापता येत नाही. 

Web Title : रश्मिका-विजय के रिसेप्शन में राम चरण नंगे पैर पहुंचे, देखकर सब हैरान

Web Summary : राम चरण, अयप्पा दीक्षा का पालन करते हुए, रश्मिका और विजय के रिसेप्शन में काले वस्त्रों में नंगे पैर पहुंचे, जिससे उपस्थित लोग हैरान रह गए। इस धार्मिक प्रथा में भक्तों को 41 दिनों तक काले कपड़े पहनने और नंगे पैर रहना होता है। उनकी भक्ति की प्रशंसा हुई।

Web Title : Ram Charan's Barefoot Appearance at Rashmika-Vijay Reception Surprises Guests

Web Summary : Ram Charan, observing Ayyappa Deeksha, attended Rashmika and Vijay's reception barefoot in black attire, surprising attendees. This religious observance requires devotees to wear black and remain barefoot for 41 days. His devotion garnered praise.