कपाळी भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ ; महादेवाच्या अवतारात प्रभास, कधी रिलीज होणार नवीन सिनेमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:59 IST2025-02-03T14:59:14+5:302025-02-03T14:59:43+5:30

प्रभासचा आगामी सिनेमातील भगवान शंकराचा लूक व्हायरल झालाय. प्रभास महादेवाच्या अवतारात ओळखूच येत नाहीये (prabhas)

superstar prabhas look in kannappa as mahadev lord shankar akshay kumar | कपाळी भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ ; महादेवाच्या अवतारात प्रभास, कधी रिलीज होणार नवीन सिनेमा?

कपाळी भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ ; महादेवाच्या अवतारात प्रभास, कधी रिलीज होणार नवीन सिनेमा?

रिबेल स्टार अशी ओळख असलेला प्रभास (prabhas) हा सर्वांचा लाडका अभिनेता. प्रभासच्या विविध सिनेमांमधून भूमिका साकारुन सर्वांचं मन जिंकलंय. प्रभासने 'बाहुबली' सिनेमातून भारतात नव्हे तर जगभरात त्याच्या अभिनयाचा डंका वाजवला. प्रभासने कायमच विविध भूमिका साकारुन लोकांना आश्चर्याचा सुखद धक्का देत असतो. प्रभासच्या आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालंय. या पोस्टरमध्ये प्रभासचा महादेव अवतार पाहून सर्वचजण थक्क झालेत. (kannappa movie)

प्रभासचा आगामी सिनेमात महादेव अवतार

सुपरस्टार प्रभासचा आजवरचा वेगळा सिनेमा म्हणून 'कन्नप्पा' सिनेमाकडे पाहिलं जातंय. 'कन्नप्पा'मध्ये याआधी अक्षय कुमारचा (akshay kumar) महादेवाचा अवतारातील लूक पाहायला मिळाला. आज नुकतंच प्रभासचा भगवान शंकराचा रुपातील फोटो व्हायरल झालाय. यात कपाळी भस्म, गळ्यात रुद्राक्ष असलेल्या लूकमध्ये प्रभास बघायला मिळतोय. प्रभासचा हा महादेवाचा लूक समोर येताच चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.


प्रभासचा नवीन सिनेमा कधी रिलीज होणार?

'कन्नप्पा' सिनेमा हा साउथचा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाची रिलीज डेटही अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलीय. हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ ला रिलीज होणार आहे. 'कन्नप्पा' हा एक काल्पनिक सिनेमा असून शिवभक्त कन्नप्पावर हा सिनेमा आधारीत आहे. या सिनेमात अक्षय कुमार झळकणार असून या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय कुमार तेलुगु सिनेमाइंडस्ट्रीत पदार्पण करतोय. प्रभासही या सिनेमात झळकणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला आहे. विशेष म्हणजे दोघंही सुपरस्टार महादेवाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

 

Web Title: superstar prabhas look in kannappa as mahadev lord shankar akshay kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.