Vijay Thalapathy : कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती; किती आहे नेटवर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 11:45 AM2024-06-23T11:45:29+5:302024-06-23T11:50:12+5:30

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून थलापती विजयला ओळखलं जातं.

South superstar Vijay Thalapathy net worth | Vijay Thalapathy : कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती; किती आहे नेटवर्थ?

Vijay Thalapathy : कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती; किती आहे नेटवर्थ?

Thalapathy Vijay :  दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून थलापती विजयला (Thalapathy Vijay) ओळखलं जातं. आजवर त्याने अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने त्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. त्याचे कोट्यवधी चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात.  थलापती विजय हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्याचे नेटवर्थ किती आहे आणि अभिनेता कोणत्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतो हे जाणून घेऊया…

विजयचा जन्म 22 जून 1974 मध्ये चेन्नईमध्ये झाला.  त्याचं खर नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे. विजयचे वडील दिग्दर्शक आणि आणि आई गायिका होती.  वडील दिग्दर्शक असले तरी सिनेमात काम करून इंडस्ट्रीमध्ये आपलं कमावणं विजयसाठी सोपं नव्हतं. विजयनं वयाच्या 10व्या वर्षी बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरूवात केली. तर 1992मध्ये आलेल्या Naalaiya Theerpu सिनेमातून त्याने प्रमुख अभिनेता म्हणून काम करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्याचं वय 18 वर्ष होतं. आतापर्यंतच्या करिअरमध्ये विजयने 66 पेक्षा अधिक सिनेमात काम केलंय. आज त्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. 

थलापती विजय हा चित्रपटांमधून प्रचंड कमाई करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार तो एका चित्रपटातून 100 कोटींहून अधिक कमावतो. त्याच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर, TIO रिपोर्टनुसार, त्याची एकूण संपत्ती 600 कोटींपर्यंत आहे. त्याच्या अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. चेन्नईच्या नीलंकराई येथील कॅसुआरिना ड्राईव्ह स्ट्रीटवर समुद्राजवळ एका आलिशान घरात अभिनेता राहतो. त्याची किंमत 80 कोटींच्या आसपास असल्याचे सांगितलं जातं. याशिवाय तिरुवल्लूर, तिरुपोरूर, तिरुमाझीसाई आणि वंदलूर येथेही त्यांची अनेक मालमत्ता आहेत. ज्याची किंमत 100 कोटींच्या आसपास आहे. 

आता थलापती हा राजकारणातदेखील उतरला आहे. त्याने स्वत:चा ‘तमिझगा वेत्री कळघम’ नावाचा पक्ष काढला आहे. 2026 साली होणाऱ्या तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे. थलपती विजय हा तमिळनाडूमध्ये अभिनेता म्हणून खूप प्रसिद्ध आहे. हीच बाब त्याला राजकारणात आपले बस्तान बसवण्यासाठी महत्त्वाची आणि मदतीची ठरणार आहे. 
 

Web Title: South superstar Vijay Thalapathy net worth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.