फोटोतील 'ही' चिमुकली आहे आज IAS ऑफिसर; 15 सुपरहिट सिनेमा करुन सोडली इंडस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 10:32 AM2023-09-08T10:32:20+5:302023-09-08T10:32:43+5:30

HS keerthana: यांनी जवळपास ६ वेळा UPSC ची परिक्षा दिली. यात ५ वेळा त्यांना अपयश आलं.

south-cinema-this-child-actress-of-south-cinema-who-cleared-the-ias-exam-and-become-ias-meet-ias-hs-keerthana | फोटोतील 'ही' चिमुकली आहे आज IAS ऑफिसर; 15 सुपरहिट सिनेमा करुन सोडली इंडस्ट्री

फोटोतील 'ही' चिमुकली आहे आज IAS ऑफिसर; 15 सुपरहिट सिनेमा करुन सोडली इंडस्ट्री

googlenewsNext

कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी सिनेसृष्टी गाजवली. मात्र, करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना या कलाकारांनी अचानकपणे सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला. यात सध्या अशा एका अभिनेत्रीची चर्चा रंगलीये जिने कलाविश्व सोडून थेट IAS ऑफिसर झाली. विशेष म्हणजे या अभिनेत्रीनने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणारी एच.एस. कीर्थना ही अभिनेत्री आज अनेकांना आठवत असेल. कीर्थनाने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं होतं. परंतु, लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच तिने इंडस्ट्रीमधून काढता पाय घेतला आणि सरळ देशसेवेकडे वळली. कीर्थना आज IAS ऑफिसर आहे.

कीर्थना यांनी सिनेइंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं होतं. जवळपास १५ हिट सिनेमा तिने दिले होते. विशेष म्हणजे कीर्थना यांनी जवळपास ६ वेळा UPSC ची परिक्षा दिली. यात ५ वेळा त्यांना अपयश आलं. मात्र, सहाव्यांदा त्यांनी दिलेल्या परिक्षेत त्यांना यश मिळालं. २०२० मध्ये त्या UPSC ची परिक्षा पास झाल्या आणि अखिल भारतीय रँक (AIR)सह त्या आएएस अधिकारी झाल्या. कीर्थना यांची कर्नाटकमधील मांड्या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त म्हणून पहिली पोस्टिंग झाली होती.

कीर्थना यांनी कर्पूरदा गोम्बे, गंगा-यमुना, मुदिना आलिया, उपेन्द्र, ए, कनूर हेग्गादती, सर्कल इंस्पेक्टर, ओ मल्लिगे, लेडी कमिश्नर, हब्बा, डोरे, सिम्हाद्रि, जननी, चिगुरु यासारख्या अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे.
 

Web Title: south-cinema-this-child-actress-of-south-cinema-who-cleared-the-ias-exam-and-become-ias-meet-ias-hs-keerthana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.