नोकरांनी रचला कट, १२ वेळा मानेवर वार केले अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अभिनेत्री, काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:28 IST2025-10-15T16:22:44+5:302025-10-15T16:28:00+5:30
नोकरांनी दिला दगा, अभिनेत्रीसह आईचाही घेतलाही जीव, कुजलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह

नोकरांनी रचला कट, १२ वेळा मानेवर वार केले अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अभिनेत्री, काय घडलेलं?
South Actress: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून येवून हिंदी चित्रपटसृष्टीतही स्थिरावणाऱ्या काही मोजक्या अभिनेत्रींमध्ये निष्पाप चेहऱ्याची अभिनेत्री म्हणजे राणी पद्मीनी.हिंदी चित्रपटसृष्टीत मोजक्याच चित्रपटात अभिनय करुन तिने चाहत्यांची मनं जिंकली. मात्र,तो स्टारडम पाहण्यासाठी ती जिवंत राहू शकली नाही.तिने स्वप्नातही विचार केला नसेल अशी घटना अभिनेत्रीसोबत घडली. नोकरांनी कट रचून या अभिनेत्रीचा खून केला होता. नेमकं काय घडलेलं जाणून घेऊया...
अभिनेत्री राणी पद्मीनी यांचा जन्म १९६२ साली चेन्नईमध्ये झाला. आपल्या लेकीने अभिनय क्षेत्रात यावं, अशी त्यांची आईची इच्छा होती. पण, तिच्या नशिबात काही औरच होतं. १९८१ मध्ये, पद्मिनीने मल्याळम चित्रपट विलांगम वीणायममध्ये छोटी भूमिका साकारली. त्यानंतर सिनेसृष्टीचे द्वार तिच्यासाठी खुले झाले. आपल्या करिअरमध्ये अभिनेत्रीने मामूटी आणि मोहनलाल सारख्या बड्या अभिनेत्यांसोबत काम केलं.राणी पद्मिनी मल्याळम सिने जगतातील एक प्रसिद्ध नाव होतं. अगदी कमी वयातच अभिनेत्रीला प्रचंड स्टारडम मिळाला. पण तिच्या घरातल्या नोकरांनी मिळून तिची हत्या केली.
नेमकं काय घडलेलं?
अभिनेत्री राणी पद्मीनीने जवळपास ६० चित्रपटांमध्ये काम केलं.हाती काम आल्याने तिची आर्थिक स्थिती सुधारली. त्यानंर राणी पद्मिनीने चेन्नईच्या अण्णा नगर पश्चिम येथे बंगला घेतला. तिच्यासोबत तिची आई इंदिरा देखील होत्या.१५ ऑक्टोबर १९८६ ची घटना आहे. नवीन घरात तिने तीन नोकर ठेवले होते. पण, त्या तिघांचेही गुन्हेगारी रेकॉर्ड होते. चोरी करण्याच्या उद्देशाने त्या तीन नोकरांनी मिळून धारदार चाकूनं रानी पद्मिनी आणि तिच्या आईची हत्या केली. अभिनेत्रीच्या मानेवर १२ वेळा त्यांनी वार केले होते. राणी आणि तिच्या आईचे रक्ताने माखलेले मृतदेह बाथरूममध्ये एकमेकांवर पडले होते. दरवाजा बंद होता आणि उग्र वास येत होता.त्यांचे मृतदेह इतके कुजलेले होते की ते बाहेर काढण्याच्या स्थितीत नव्हते.