प्रदर्शनानंतर महिनाभरात राम चरणचा 'गेम चेंजर' OTT वर होणार रिलीज; कधी, कुठे पाहता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:56 IST2025-01-22T11:52:32+5:302025-01-22T11:56:23+5:30

साउथचा मेगास्टार राम चरण 'गेम चेंजर' या सिनेमामुळे चर्चेत आहे.

south actor ram charan and kiara advani starrer game changer release on ott soon know about where to watch | प्रदर्शनानंतर महिनाभरात राम चरणचा 'गेम चेंजर' OTT वर होणार रिलीज; कधी, कुठे पाहता येणार?

प्रदर्शनानंतर महिनाभरात राम चरणचा 'गेम चेंजर' OTT वर होणार रिलीज; कधी, कुठे पाहता येणार?

Game Changer OTT Release: साउथचा मेगास्टार राम चरणचा (Ram Charan) 'गेम चेंजर' हा सिनेमा १० जानेवारी २०२५ या दिवशी जगभरात प्रदर्शित करण्यात आला. परंतु बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला फारसं यश मिळवता आलं नाही. दरम्यान, गेम चेंजर’ मध्ये  राम चरणसह बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि एसजे सूर्या, जयाराम, नासर, अंजली हे कलाकार देखील आहेत. राम चरण या चित्रपटात एका भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या आएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. शिवाय चित्रपटात त्याने वडील आणि मुलगा अशी दुहेरी भूमिका साकारली आहे. आता गेम चेंजरच्या ओटीटी रिलीजबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, राम चरणचा 'गेम चेंजर' १४ फेब्रुवारी २०२५ या दिवशी ओटीटीवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे डिजिटल हक्क आधीच विकले गेले आहेत. आता हा चित्रपट लवकरच अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होईल. गेम चेंजर थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात ओटीटीवर स्ट्रीम करण्यात येत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

बहुचर्चित 'गेम चेंजर' हा चित्रपट २०२५ मधील बिग बजेट चित्रपट आहे. सिनेमाचे बजेट सुमारे ४५० कोटी आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची गाणी तयार करण्यासाठी जवळपस 75 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला तब्बल तीन वर्षे लागली.  

Web Title: south actor ram charan and kiara advani starrer game changer release on ott soon know about where to watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.