समांथाचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे विवाहित, आहे एक मुलगी, पत्नीसोबत झाला नाही घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 09:46 IST2025-05-16T09:44:57+5:302025-05-16T09:46:00+5:30

Samantha Ruth Prabhu : साउथची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. खरेतर पुन्हा एखदा ती प्रेमात पडली आहे.

Samantha Ruth Prabhu's rumored boyfriend is married, has a daughter, and is not divorced from his wife. | समांथाचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे विवाहित, आहे एक मुलगी, पत्नीसोबत झाला नाही घटस्फोट

समांथाचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे विवाहित, आहे एक मुलगी, पत्नीसोबत झाला नाही घटस्फोट

साउथची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. खरेतर पुन्हा एखदा ती प्रेमात पडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री दिग्दर्शक राज निदिमोरु(Raj Nidimoru)ला डेट करते आहे. राजसोबत अभिनेत्रीने नुकताच सेल्फी शेअर केला आहे. ज्यात ती त्याच्यासोबत कंफर्टेबल दिसते आहे. हा फोटो पाहून चाहत्यांसह नेटकरी अभिनेत्री राज निदिमोरुसोबत ती रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोलत आहेत.

सध्या सोशल मीडियावर फक्त समांथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरू यांच्या अफेयरची चर्चा सुरू आहे. अभिनेत्री तिच्या आयुष्यात पुढे जात आहे, याबद्दल तिचे चाहते खूप खूश आहेत. पण ज्या व्यक्तीसोबत ती या नात्यात पुढे जाणार आहे तो आधीच विवाहित आहे. हे कळल्यावर चाहत्यांना धक्का बसला आहे. राजने २०१५ मध्ये श्यामली डेसोबत लग्न केले होते. रिपोर्ट्सनुसार, त्याला एक मुलगी आहे.

राजच्या लग्नाचा फोटो होतोय व्हायरल
राज निदिमोरू आणि श्यामली डे यांच्या लग्नाचा फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. राजने अद्याप श्यामलीशी घटस्फोट घेतलेला नाही आणि तो समांथासोबत प्रेमाचा पतंग उडवत आहे. परंतु, काही लोक असाही दावा करत आहेत की राज विवाहित आहे, परंतु त्याला मुलगी नाही. आता हे किती खरे आहे हे फक्त राजच सांगू शकतो.

समांथा आणि नागा चैतन्य झाले विभक्त
समांथा रूथ प्रभूने अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केले होते. परंतु चार वर्षांनी त्यांचे लग्न तुटले. यानंतर काही काळानंतर, नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न केले आणि दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.

Web Title: Samantha Ruth Prabhu's rumored boyfriend is married, has a daughter, and is not divorced from his wife.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.