शाहरुखनंतर अल्लू अर्जुनसोबत सिनेमा बनवणार अ‍ॅटली, 'ही' अभिनेत्री सुपरस्टारसोबत करणार रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 05:01 PM2024-04-02T17:01:51+5:302024-04-02T17:05:36+5:30

अ‍ॅटली कुमारच्या अपकमिंग सिनेमात अल्लू अर्जुनचं नाव फायनल झालं आहे.

Samantha Ruth Prabhu To Star Opposite Allu Arjun In Atlee's Next Project? Here's What We Know | शाहरुखनंतर अल्लू अर्जुनसोबत सिनेमा बनवणार अ‍ॅटली, 'ही' अभिनेत्री सुपरस्टारसोबत करणार रोमान्स!

शाहरुखनंतर अल्लू अर्जुनसोबत सिनेमा बनवणार अ‍ॅटली, 'ही' अभिनेत्री सुपरस्टारसोबत करणार रोमान्स!

दाक्षिणात्य सिनेविश्वातील दिग्दर्शक अ‍ॅटली याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शकांमध्ये त्याची गणना होते.  
किंग खान शाहरुखसोबतच्या त्याच्या 'जवान' सिनेमानं अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.  आता चाहते अ‍ॅटलीच्या नव्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. तर लवकरच अ‍ॅटली सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत नवा सिनेमा घेऊन येत आहे. या सिनेमात अल्लू अर्जुनसोबत लोकप्रिय अभिनेत्री दिसणार आहे. 

अ‍ॅटली कुमारच्या अपकमिंग सिनेमात अल्लू अर्जुनचं नाव फायनल झालं आहे. ॲटली पहिल्यांदाच अल्लू अर्जुनबरोबर काम करणार आहे. या सिनेमाचं शुटिंग यंदाच होणार असल्याचंही बोललं जात आहे. ॲटलीने या चित्रपटासाठी कास्टिंग प्रोसेसही सुरू केली आहे. सिनेमामध्ये हिरोईन म्हणून लोकप्रिय अभिनेत्री समांथाला अप्रोच करण्यात आलं आहे.  अल्लू आणि समांथा या सुपरहीट जोडीला अ‍ॅटली कुमार एकत्र आणणार आहे.

समांथा आणि अल्लू अर्जुन यांनी या आधी Son of Satyamurthay या सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमातील अल्लू अर्जुन आणि समंथाच्या जोडीचंही विशेष कौतुक झालं. तसेच अल्लू अर्जुनच्या पुष्पा या सिनेमात समांथा प्रभू बरोबर अल्लू अर्जुन रोमान्स करताना दिसला होता. सिनेमातील 'उ अंटवा' गाण्यानं प्रेक्षकांना भुरळ घातली होती.  शिवाय अ‍ॅटली आणि समांथा यांच्या चांगली मैत्री आहे. त्यामुळे समांथा एटलीच्या सिनेमासाठी होकार देईल असं म्हटलं जात आहे. समांथा आणि अल्लू अर्जुन एकत्र आल्यास तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, यात शंका नाही. 
 

Web Title: Samantha Ruth Prabhu To Star Opposite Allu Arjun In Atlee's Next Project? Here's What We Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.