समांथा रुथ प्रभूनं दिली प्रेमाची कबुली? पुन्हा शेअर केले रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:46 IST2025-05-14T16:39:13+5:302025-05-14T16:46:18+5:30

समांथा रुथ प्रभूनं शेअर केलेल्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Samantha Ruth Prabhu Shared Photos With Rumored Boyfriend Raj Nidimoru | समांथा रुथ प्रभूनं दिली प्रेमाची कबुली? पुन्हा शेअर केले रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचे फोटो!

समांथा रुथ प्रभूनं दिली प्रेमाची कबुली? पुन्हा शेअर केले रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचे फोटो!

Samantha Ruth Prabhu-Raj Nidimoru:  अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्ट्रीसह बॉलिवूडमध्येही एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्रीच्या प्रोफेशनल लाईफइतकीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त चर्चा तिच्या पर्सनल लाईफची होते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री 'सिटाडेल: हनी बनी' या चित्रपटाचे दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांना आता अभिनेत्रीनं स्वत: खतपाणी घातलं आहे.  समांथाने तिच्या इन्स्टाग्रामवर राज निदिमोरूसोबतचे फोटो शेअर केले आहेत. 

समांथा सध्या तिच्या 'शुभम' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा तिचा निर्माती म्हणून पहिला सिनेमा आहे. या चित्रपटाच्या कास्टसोबतचे फोटो समांथानं शेअर केलेत. या फोटोंमध्ये ती राज निदिमोरू यांच्यासोबत दिसून आली आहे. यामुळे दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये समांथानं लिहलं, "आमच्यासोबत 'शुभम' पाहिल्याबद्दल, अनुभव घेतल्याबद्दल आणि साजरं केल्याबद्दल मनापासून आभार! हे आमचं पहिलं पाऊल होतं, जे मनापासून टाकलं गेलं. या विश्वासानं की नवीन कथादेखील महत्त्वाच्या असतात. 'शुभम'सोबत या प्रवासाची सुरुवात झालीये. काय धमाकेदार सुरुवात झालीय ना!", असं तिनं लिहलं. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.


याआधीही समांथानं राज यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले होते. ज्यात राज हे समांथाच्या पाळीव कुत्र्यासोबत खेळताना दिसले होते. दरम्यान, समांथा आणि राज यांनी या डेटिंगच्या चर्चांवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर दोघांमधील वाढती जवळीक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान समांथाचं पहिलं लग्न अभिनेता नागा चैतन्यशी झाले होते. २०७ मध्ये गोव्यात भव्य स्वरुपात त्यांनी लग्न केले. तथापि, लग्नाच्या चार वर्षांनंतर, २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. तर आता नागा चैतन्यचे लग्न शोभिता धुलिपालाशी झालं आहे. 
 

Web Title: Samantha Ruth Prabhu Shared Photos With Rumored Boyfriend Raj Nidimoru