समांथाचा रुमर्ड बॉयफ्रेंड कोण? डेटिंगच्या चर्चांमध्ये नव्या फोटोनं वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:50 IST2025-03-11T14:49:45+5:302025-03-11T14:50:17+5:30

समांथाचा रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो समोर आला आहे. 

Samantha Ruth Prabhu New Pic With Raj Nidimoru Fuels Dating Rumours | समांथाचा रुमर्ड बॉयफ्रेंड कोण? डेटिंगच्या चर्चांमध्ये नव्या फोटोनं वेधलं लक्ष

समांथाचा रुमर्ड बॉयफ्रेंड कोण? डेटिंगच्या चर्चांमध्ये नव्या फोटोनं वेधलं लक्ष

Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) कायमच चर्चेत असते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्ट्रीसह तिनं बॉलिवूडमध्येही अभिनयाच्या जोरावर एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 
अभिनयासोबतचं तिच्या प्रेमळ स्वभावामुळे तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्रीच्या प्रोफेशनल लाईफइतकीच किंबहुना तिच्यापेक्षा जास्त चर्चा तिच्या पर्सनल लाईफची होते.   गेल्या अनेक दिवसांपासून ती लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. आता तिचा रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो समोर आला आहे. 

नागा चैतन्यशी घटस्फोट झाल्यानंतर आता समांथाच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम आल्याचं बोललं जातं आहे. समांथा ही सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरू याला डेट करत असल्याची चर्चा आहे.  अलिकडेच समांथा आणि राज पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत.  एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या ब्रंच दरम्यान काढलेला हा फोटो आहे. ज्यामध्ये समांथा एका सुंदर हिरव्या ड्रेसमध्ये दिसतेय. तर  कॅज्युअल लूकमध्ये पाहायला मिळतोय.  या फोटोमध्ये  राज सामंथाच्या अगदी मागे उभा आहे. त्यानं समांथाच्या खांद्यावर हात ठेवल्याचं दिसतंय. त्याचा हा फोटो सध्या चर्चेत आला आहे. 

याआधी समांथाने १ फेब्रुवारी रोजी इंस्टाग्रामवर वर्ल्ड पिकलबॉल लीग सामन्यादरम्यानचे फोटो शेअर केले होते. या फोटोत ती राजसोबत दिसली होती.  राज निदिमोरू हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. त्यानं आपला मीत्र डीकेसोबत मिळून 'द फॅमिली मॅन', 'फर्जी', 'सिटाडेल हनी बनी', 'गन्स अँड गुलाब' या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलंय. राज आणि डीके (Raj & DK) ही जोडी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. जर राज आणि समांथा खरंच रिलेशनशीपमध्ये असतील तर आता हे नातं ते कधी अधिकृत करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

Web Title: Samantha Ruth Prabhu New Pic With Raj Nidimoru Fuels Dating Rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.